फाल्गुनी पाठक मराठीत गाणार

By Admin | Updated: October 7, 2016 04:53 IST2016-10-07T04:53:20+5:302016-10-07T04:53:20+5:30

गायिका फाल्गुनी पाठक लवकरच एका मराठी चित्रपटात गाणार असल्याचे कळतेय. आगामी ‘गुरू’ या चित्रपटात आपल्याला फाल्गुनीचा आवाज ऐेकायला मिळू शकतो

Phalguni Pathak will sing in Marathi | फाल्गुनी पाठक मराठीत गाणार

फाल्गुनी पाठक मराठीत गाणार

गायिका फाल्गुनी पाठक लवकरच एका मराठी चित्रपटात गाणार असल्याचे कळतेय. आगामी ‘गुरू’ या चित्रपटात आपल्याला फाल्गुनीचा आवाज ऐेकायला मिळू शकतो. एक वेगळ्या प्रकारचे गाणे ती गाणार असल्याचे समजतेय. फाल्गुनीच्या आवाजावर आधीच तरुणाई फिदा आहे. मराठीत ती कशाप्रकारे गाते, हे ऐकण्यासाठी नक्कीच तिचे चाहते उत्सुक असतील. तिच्या खास गाण्याच्या शैलीमुळे फाल्गुनी ओळखली जाते. गरबा, दांडियामध्ये तर फाल्गुनीची गाणी चांगलीच गाजली आहेत. अनेक अल्बम्समधूनही फाल्गुनीच्या अदा आपण पाहिल्या आहेतच. आता फाल्गुनी खरंच मराठीत गाणार का, ते आपल्याला लवकरच समजेल.

Web Title: Phalguni Pathak will sing in Marathi