परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:24 IST2025-05-17T13:23:28+5:302025-05-17T13:24:07+5:30

Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या 'केसरी वीर' चित्रपटासाठी चर्चेत आहे.

Paresh Rawal's 'Hera Pheri 3' is over! Suniel Shetty breaks his silence, says - ''Without Babu Bhaiya, Shyam...'' | परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

'हेरा फेरी ३' (Hera Pheri 3 Movie) चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या कल्ट क्लासिक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र नुकतेच असे वृत्त समोर आले होते की, बाबूरावची भूमिका साकारणारे परेश रावल (Paresh Rawal) यांनी चित्रपटाला रामराम केला आहे. अभिनेत्याने एका मुलाखतीत या वृत्ताला दुजोराही दिला. त्यांनी या सिनेमातून एक्झिट घेणे प्रेक्षकांसाठी खूपच धक्कादायक होते. आता यावर सुनील शेट्टी(Suniel Shetty)ने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता म्हणाला की, हेरा फेरी अक्षय कुमार आणि परेश रावलशिवाय अपूर्ण आहे.

सुनील शेट्टीने बॉलिवूड बबलशी बोलताना एका मल्टीस्टारर चित्रपटाचा भाग होण्याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, "मल्टीस्टार कलाकारांच्या चित्रपटाचा भाग असण्यात सर्वात जास्त रोमांचक गोष्ट काय आहे. सौंदर्य त्या पात्रात आहे. तुम्हाला अशी भूमिका साकारण्याची संधी कुठे मिळते? तुम्हाला अशी पात्रे किती वेळा मिळतात? खूप क्वचितच. म्हणून जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा ते अशा पद्धतीने करा की प्रेक्षकांना ते वर्षानुवर्षे लक्षात राहील."

''बाबू भैयाशिवाय श्याम...''
परेश रावल असेही म्हणाले की, "जेव्हा हेरा फेरीचा प्रश्न येतो तेव्हा जर बाबू भाई (परेश रावल) आणि राजू (अक्षय कुमार) नसते तर श्याम (सुनील शेट्टी) अस्तित्वात नसता आणि त्याला काही अर्थ नसता. जर तुम्ही त्यापैकी एकही काढून टाकला तर चित्रपट चालणार नाही."

या कारणामुळे परेश रावल यांनी सोडला सिनेमा
क्रिएटिव्ह मतभेदांमुळे परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडल्याचे समजते आहे. अभिनेत्याने या बातमीला दुजोरा देत म्हटले की, ही वस्तूस्थिती आहे. या खुलाशाने चाहते नाराज झाले आणि त्यांना त्यावर विश्वास बसत नव्हता. एका युजरने म्हटले, "काय? तर हेरा फेरी ३ ची सगळी मजा संपली?" दुसऱ्या युजरने लिहिले की, "परेश रावल नाही, हेरा फेरी ३ नाही." आणखी एकाने लिहिले, "ही आता बनवता कामा नये... पंथला पंथच राहू द्या, फक्त पैशासाठी सीरिज नष्ट करू नका."

Web Title: Paresh Rawal's 'Hera Pheri 3' is over! Suniel Shetty breaks his silence, says - ''Without Babu Bhaiya, Shyam...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.