Panchayat 4: फुलेरा ग्रामपंचायत मनोरंजनासाठी पुन्हा उघडणार; 'पंचायत ४'च्या रिलीज डेटची घोषणा

By देवेंद्र जाधव | Updated: April 3, 2025 14:51 IST2025-04-03T14:49:31+5:302025-04-03T14:51:25+5:30

Panchayat 4 Release Date Announced: आनंदाची बातमी! फुलेरा ग्रामपंचायत मनोरंजनासाठी पुन्हा उघडणार; 'पंचायत ४'च्या रिलीज डेटची घोषणा (panchayat 4)

panchayat 4 release date announced prime video jitendra kumar raghuveer yadav | Panchayat 4: फुलेरा ग्रामपंचायत मनोरंजनासाठी पुन्हा उघडणार; 'पंचायत ४'च्या रिलीज डेटची घोषणा

Panchayat 4: फुलेरा ग्रामपंचायत मनोरंजनासाठी पुन्हा उघडणार; 'पंचायत ४'च्या रिलीज डेटची घोषणा

Panchayat 4 Release Date: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि निखळ करमणूक करणारी वेबसीरिज म्हणजे पंचायत. वेबसीरिजचे आधीचे तीनही सीझन चांगलेच गाजले. आता 'पंचायत' (panchayat) वेबसीरिजचा चौथा सीझन अर्थात 'पंचायत ४'  ची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नुकतीच प्राइम व्हिडीओने 'पंचायत ४'च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. एका खास प्रमोशनल व्हिडीओच्या माध्यमातून 'पंचायत ४'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे.

या तारखेला रिलीज होणार 'पंचायत ४'

'पंचायत ४'ची रिलीज डेट नुकतीच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आलीय. यामध्ये एक प्रमोशनल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून दिसतं की 'पंचायत'च्या पहिल्या सीझनला रिलीज होऊन पाच वर्ष झाली आहेत. त्यानंतर 'पंचायत' ऑफिसमध्ये सचिवजींची एन्ट्री होते. 'पंचायत' वेबसीरिजचे जे मीम व्हायरल झाले आहेत त्याबद्दल चर्चा होते. आणि शेवटी 'पंचायत ४'ची रिलीज डेट दिसते. २ जुलैला प्राइम व्हिडीओवर 'पंचायत ४' रिलीज होणार आहे. हे समजताच सर्वांना आनंद झाला आहे.

'पंचायत ४'मध्ये कोण दिसणार

'पंचायत ३'मध्ये शेवटी दिसलं की प्रधानजी गोळी लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दिसतात. तर दुसरीकडे सचिवजी, विकास  आणि प्रल्हादचा विधायक, भूषणसोबत जोरदार राडा होतो. शेवटी सर्वजण पोलीस चौकीत खाली बसलेले दिसतात. आता पुढे कथानक कोणतं वळण घेणार, प्रधानजी या हल्ल्यातून सुखरुप वाचतात का, सचिवजी आणि रिंकीचं लग्न होईल का, अशा प्रश्नांची उत्तरं 'पंचायत ४'मधून मिळतील. यासाठी प्रेक्षकांना २ जुलैपर्यंत वाट पहावी लागेल.

Web Title: panchayat 4 release date announced prime video jitendra kumar raghuveer yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.