The Kashmir Files: पल्लवी जोशींचा मोठा गौप्यस्फोट, "माझ्याविरोधात फतवा काढला, धमक्याही मिळालेल्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 10:40 AM2022-03-14T10:40:52+5:302022-03-14T10:41:58+5:30

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाविषयी निर्मात्या पल्लवी जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

pallavi joshi on biggest challenge filming vivek agnihotris the kashmir files fatwah issued on our names | The Kashmir Files: पल्लवी जोशींचा मोठा गौप्यस्फोट, "माझ्याविरोधात फतवा काढला, धमक्याही मिळालेल्या"

The Kashmir Files: पल्लवी जोशींचा मोठा गौप्यस्फोट, "माझ्याविरोधात फतवा काढला, धमक्याही मिळालेल्या"

googlenewsNext

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या सिनेमात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने लोकं चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. मराठमोळ्या अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) या काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर विवेक अग्नीहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट ११ मार्च रोजी देशभरात प्रदर्शिक करण्यात आला. या चित्रपटाला ६३० स्क्रिन्स मिळाले असले तरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता, काही राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी यांनीदेखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचा एक मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. 

या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान आपल्या आणि विवेक अग्नीहोत्री यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट पल्लवी जोशी यांनी केला. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "द काश्मीर फाईल्स सारखा गंभीर चित्रपट तयार करणं ही सोपी गोष्ट नव्हती. चित्रपटात काश्मीरमध्ये चित्रीकरण केलेला भाग हा सर्वात सोपा आणि छोटा होता. जिकडे या चित्रपटाचं काम पूर्ण करण्यासाठी चार वर्षे लागली, तिकडे चित्रीकरण एका महिन्यात पूर्ण झालं. जेव्हा फतवा जारी केला तेव्हा आम्ही अखेरचा सीन चित्रित करत होतो," असं त्यांनी सांगितलं. 

माहिती गुप्त ठेवण्याचा निर्णय
पल्लवी जोशी आणि विवेक अग्नीहोत्री यांनी ही माहिती युनिटपासून गुप्त ठेवण्याचाच निर्णय घेतला आणि सीन पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत केलं.. एकदा आपण या ठिकाणाहून निघून गेलो, तर त्यानंतर या ठिकाणी येण्याची पुन्हा संधी मिळणार नाही हे आपल्याला माहित होतं, यामुळेच आपण हा निर्णय घेतला असल्याचं त्या म्हणाल्या. चित्रिकरणादरम्यान निर्मात्यांसमोप हीच एकमेव समस्या होती. तसंच द काश्मीर फाईल्समुळे विवेक अग्नीहोत्री यांनाही अनेक धमक्या मिळाल्या असंही त्यांनी नमूद केलं. 

ट्विटर अकाऊंटही केलं निष्क्रिय
याच कारणांमुळे आपल्याला ट्विटर अकाऊंटही निष्क्रिय करावा लागला होता, असं पल्लवी जोशी म्हणाल्या. "सातत्यानं मिळणाऱ्या धमक्या आणि आपल्या विरोधात जारी केलेल्या फतव्यांमुळे आपल्याला मानसिक तणावाचा सामना करावा लागला," असंही त्यांनी सांगितलं. द काश्मीर फाईल्स या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती हे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. 

Web Title: pallavi joshi on biggest challenge filming vivek agnihotris the kashmir files fatwah issued on our names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.