‘ये है मोहब्बतें’ मालिकेवर पाकिस्तानात बंदी ?

By Admin | Updated: June 9, 2016 02:48 IST2016-06-09T02:48:07+5:302016-06-09T02:48:07+5:30

स्टार प्लस या वाहिनीवरील ‘ये है मोहब्बतें’ ही मालिका देशातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे.

Pakistan ban on 'Ye Hai Mohabbatein' series? | ‘ये है मोहब्बतें’ मालिकेवर पाकिस्तानात बंदी ?

‘ये है मोहब्बतें’ मालिकेवर पाकिस्तानात बंदी ?


स्टार प्लस या वाहिनीवरील ‘ये है मोहब्बतें’ ही मालिका देशातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरील भारतीय रसिकांसोबत परदेशातही या मालिकेचे फॅन आहेत. त्यासोबतच बालाजी टेलीफिल्म्सची ही मालिका पाकिस्तानातील रसिकांनाही चांगलीच भावतेय. आता पाकिस्तानातील याच फॅन्सना ही मालिका पाहण्यापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील ‘उर्दू-वन’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जाते. १ जून रोजी प्रसारित झालेल्या या मालिकेतील भागात रमण (करण पटेल) आणि इशिता (दिव्यांका त्रिपाठी) यांच्यातील इंटिमेट सीन दाखवण्यात आला होता. पाकिस्तानातील मीडिया कायद्यानुसार, अशा दृश्यांचे प्रसारण म्हणजे अश्लीलता असून, त्याबाबत ‘उर्दू-वन’ या वाहिनीला नोटीस बजावण्यात आलीय. ही मालिका कुटुंबाला एकत्रित पाहण्यायोग्य नसल्याचे यात नमूद आहे. त्यामुळे ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेवर पाकिस्तानात बंदी येण्याची शक्यता आहे.

Web Title: Pakistan ban on 'Ye Hai Mohabbatein' series?