अगं बाई अरेच्चा... चित्रपटाचे येणार पाच भाग?

By Admin | Updated: January 26, 2017 06:53 IST2017-01-26T06:53:12+5:302017-01-26T06:53:25+5:30

केदार शिंदे दिग्दर्शित अगं बाई अरेच्चा या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली होती. या चित्रपटाचे दोन भाग देखील प्रदर्शित झाले आहेत.

Oh yes ... Five parts of the film? | अगं बाई अरेच्चा... चित्रपटाचे येणार पाच भाग?

अगं बाई अरेच्चा... चित्रपटाचे येणार पाच भाग?

केदार शिंदे दिग्दर्शित अगं बाई अरेच्चा या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली होती. या चित्रपटाचे दोन भाग देखील प्रदर्शित झाले आहेत. परंतु, आता या सिनेमाचे एकूण पाच भाग प्रदर्शित होणार असल्याचे कळतेय. पंचेंद्रियांवर भाष्य करणारा हा चित्रपट असून पहिल्या सिनेमामध्ये मनातील आवाज ऐकु येणारा विषय अतिशय उत्तम मांडला होता. तर दुसरा चित्रपट हा स्पर्शावर आधारीत होता. असेच आता पुढील तीन भाग देखील याच मालिकेनुसार भाष्य करणारे असतील. लवकरच ‘अगं बाई अरेच्चा - ३ ’प्रेक्षकांच्या भेटीला आला तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: Oh yes ... Five parts of the film?