नितीन गडकरींची आवडती अभिनेत्री कोण? पत्नीसमोरच सांगून टाकलं नाव, फराह खान म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:19 IST2026-01-04T12:18:34+5:302026-01-04T12:19:50+5:30

फराहने तिचा कुक दिलीपसह नितीन गडकरींच्या दिल्लीतील घराची सफर चाहत्यांना घडवली.

Nitin Gadkari Shared Favorite Actress In Interview With Farah Khan | नितीन गडकरींची आवडती अभिनेत्री कोण? पत्नीसमोरच सांगून टाकलं नाव, फराह खान म्हणाली...

नितीन गडकरींची आवडती अभिनेत्री कोण? पत्नीसमोरच सांगून टाकलं नाव, फराह खान म्हणाली...

Nitin Gadkari Favorite Actress : फराह खान बॉलिवूडमधील एक उत्तम दिग्दर्शक, डान्सर, कोरिओग्राफर तर आहेच, पण सोबतच ती तितकीच फुडी देखील आहे. फराहला वेगवेगळ्या चवींचे पदार्थ स्वतःला करायला आणि करुन खाऊ घालायला खूप आवडतात.  फराह खान सध्या तिच्या युट्यूब चॅनल्समुळे चर्चेत असते. फराह तिचा कुक दिलीपसह सेलिब्रिटींच्या घरी जाते आणि रेसिपी शेअर करते. त्यांच्याशी गप्पा मारते आणि त्यांचं आलिशान घरही दाखवते. नुकतंच ती केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचली आहे. फराहने तिचा कुक दिलीपसह नितीन गडकरींच्या दिल्लीतील घराची सफर चाहत्यांना घडवली. यावेळी तिनं  नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या.

फराह खान दिल्लीत येत असल्याने कांचन गडकरी तिला भेटण्यासाठी नागपूरहून दिल्लीत दाखल झाल्या. यावेळी नितीन गडकरी यांनी फराह खानला आवडते चित्रपट, अभिनेता आणि अभिनेत्रीबद्दल सांगितलं. फराह खानने जेव्हा गडकरींना विचारले की, "तुम्ही चित्रपट पाहता का?" तेव्हा गडकरींनी हसून उत्तर दिले, "हो". त्यांनी फराह खानचा गाजलेला चित्रपट 'ओम शांती ओम' पाहिल्याचेही आवर्जून सांगितले. गडकरींना त्यांचा आवडता अभिनेता विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले. विशेष म्हणजे, तुमची आवडती अभिनेत्री कोण?

आपल्या पत्नीसमोरच फराह खानच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल सांगितलं. फराह खान हिने विचारले की, तुमची आवडती अभिनेत्री कोण? यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी म्हटले की,  "मला 'रजनीगंधा' चित्रपटातील अभिनेत्री विद्या सिन्हा खूप आवडायची". यावेळी बोलताना गडकरी पुढे म्हणाले, "पण आता ती या जगात नाहीये". त्यावर फराह खानने साशंकता व्यक्त करत म्हटले, "बहुतेक ती आहे...". पण, गडकरी यांनी सांगितले की, "नाही नाही, मला स्मृती इराणी यांनी सांगितले होते की ती आता या जगात नाहीये".

दरम्यान, नितीन गडकरी यांची माहिती अचूक होती. ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे १५ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईत निधन झाले आहे. विद्या सिन्हा यांनी ७० च्या दशकात 'छोटी सी बात', 'पती पत्नी और वो' आणि 'रजनीगंधा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.  मॉडेलिंगमधून सुरुवात केलेल्या विद्या सिन्हा यांनी 'बिजली' या मराठी चित्रपटातही काम केले आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला आणि त्यांचे वडील राणा प्रताप सिंह हे फिल्म निर्माते होते.

Web Title : नितिन गडकरी ने पत्नी के सामने फराह खान को बताई अपनी पसंदीदा अभिनेत्री।

Web Summary : नितिन गडकरी ने फराह खान को बताया कि विद्या सिन्हा उनकी पसंदीदा अभिनेत्री थीं, जबकि उनकी पत्नी मौजूद थीं। उन्होंने 'ओम शांति ओम' देखने और अमिताभ बच्चन की प्रशंसा करने का उल्लेख किया। सिन्हा का 2019 में निधन हो गया।

Web Title : Nitin Gadkari reveals his favorite actress to Farah Khan, wife present.

Web Summary : Nitin Gadkari revealed actress Vidya Sinha was his favorite to Farah Khan, while his wife was present. He mentioned watching 'Om Shanti Om' and admires Amitabh Bachchan. Sinha passed away in 2019.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.