बातमी, स्पष्टीकरण आणि बातमी...

By Admin | Published: January 11, 2016 02:00 AM2016-01-11T02:00:08+5:302016-01-11T02:00:08+5:30

एप्रिल २०१५ मध्ये ज्या बातमीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले होते त्या बातमीचे सत्य २०१६ च्या पहिल्याच महिन्यात समोर आले आहे.

News, explanations and news ... | बातमी, स्पष्टीकरण आणि बातमी...

बातमी, स्पष्टीकरण आणि बातमी...

googlenewsNext

एप्रिल २०१५ मध्ये ज्या बातमीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले होते त्या बातमीचे सत्य २०१६ च्या पहिल्याच महिन्यात समोर आले आहे. बातमी सलमान खानच्या सुलतान या चित्रपटाबाबतची आहे. यशराज बॅनरच्या या सिनेमात सलमानची नायिका अनुष्का शर्मा असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी तिने यासाठी नकार दिल्याचे सांगितले होते. आता खुद्द अनुष्का शर्माने ही माहिती दिली आहे.
यापूर्वी आदित्य चोप्राने दिग्दर्शक म्हणून परत येण्याचे जाहीर केले त्यावेळी बेफिकरे या चित्रपटाचा नायक रणवीर सिंग असेल असे सांगण्यात आले होते. मात्र या बातमीचे आधिकृतरित्या स्पष्टीकरण देण्यात आले. अन् अखेर रणवीर सिंगनेच आपण या चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले आहे. धर्मेश दर्शन दिग्दर्शित ‘धडकन’साठी सुरुवातीपासून शिल्पा शेट्टीच्या नावाची चर्चा होती. दर्शन यांनी याचे स्पष्टीकरण देत शिल्पा हीच नायिका असल्याचे स्पष्ट केले.
अजय देवगणच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘राजूचाचा’ या चित्रपटापूर्वी आपण असा कोणताच चित्रपट तयार करणार नसल्याचे त्याने सांगितले होते. शूटिंग सुरू झाली त्यावेळी मात्र सत्य समोर आले. तो म्हणाला मीडियापासून ही बातमी मला लपवायची होती. मीडियात जोरदार प्रमोशन केल्यावरही हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. मिस युनिव्हर्सचा खिताब मिळविल्यावर सुष्मीता सेनने मला सामाजिक काम करायचे असे सांगितले. तीनच महिन्यात सुष्मिता महेश भट्ट, विक्रम भट्ट यांच्या चित्रपटात काम करणार असल्याची बातमी आली. दोन्ही बाजूंनी यावर स्पष्टीकरण देण्यात आले. अन् सुष्मिता सेनने सिनेजगतात पाऊल ठेवले.
सुभाष घई यांनी ‘खलनायक’ बनविण्याची घोषणा केल्यावर मुख्य भूमिकेसाठी कुणाचेही नाव जाहीर केले नाही. मात्र मीडियात संजय दत्तच्या नावची चर्चा झाली. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. घईसोबत संजयने विधातामध्ये काम केले होते व दोघांमधील संबध चांगले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र आठच आठवड्यात अधिकृतरित्या संजय दत्तचे नाव ‘खलनायक’साठी जाहीर करण्यात आले. ुबातमी, स्पष्टीकरण आणि बातमीचा हा प्रवास आजही असाच निरंतर सुरू आहे. anuj.alankar@lokmat.com

 

Web Title: News, explanations and news ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.