'धडक २'चं नवीन पोस्टर रिलीज, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीची रोमँटिक केमिस्ट्री चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:59 IST2025-07-09T15:58:42+5:302025-07-09T15:59:21+5:30

Dhadak 2 Movie: सध्या सिद्धांत आणि तृप्ती त्यांच्या आगामी चित्रपट 'धडक २'च्या तयारीत व्यग्र आहेत. करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर नुकतेच या चित्रपटाचे एक रोमँटिक पोस्टर शेअर केले आहे.

New poster of 'Dhadak 2' released, Siddharth Chaturvedi and Trupti Dimri's romantic chemistry is in the news | 'धडक २'चं नवीन पोस्टर रिलीज, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीची रोमँटिक केमिस्ट्री चर्चेत

'धडक २'चं नवीन पोस्टर रिलीज, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीची रोमँटिक केमिस्ट्री चर्चेत

जान्हवी कपूर(Janhavi Kapoor)ने 'धडक' (Dhadak Movie) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर(Ishaan Khattar)नेही सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सुमारे ८ वर्षांनंतर आता त्याच्या सीक्वल 'धडक २' (Dhadak 2 Movie) ची चर्चा आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. सध्या सिद्धांत आणि तृप्ती त्यांच्या आगामी चित्रपट 'धडक २'च्या तयारीत व्यग्र आहेत. बुधवारी करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटाचा एक रोमँटिक पोस्टर शेअर करून घोषणा केली आणि सांगितले की त्याचा ट्रेलर शुक्रवारी ११ जुलै रोजी प्रदर्शित होईल.

करण जोहरने 'धडक २' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, 'करा. एक धडक.' त्याने लिहिले की, 'धडक २' चा ट्रेलर या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये सिद्धांत आणि तृप्ती एकमेकांना मिठी मारत रोमँटिक पोझ देताना दिसत आहेत. या पोस्टरवर लिहिले की, 'जर तुम्हाला मरणे आणि लढणे यापैकी एक निवडायचे असेल तर लढा.'


'धडक २' सिनेमाबद्दल
'धडक २' हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे, ज्याची कथा शाजिया इक्बाल यांनी लिहिली आहे आणि तिने त्याचे दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने तयार केला आहे. असे म्हटले जात आहे की हा चित्रपट 'धडक'चा सीक्वल आहे, जो स्वतः सुपरहिट मराठी चित्रपट 'सैराट'चा रिमेक होता. 'धडक २' हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: New poster of 'Dhadak 2' released, Siddharth Chaturvedi and Trupti Dimri's romantic chemistry is in the news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.