मनीषा कोईराला नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ही नेपाळी सुंदरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 05:40 IST2016-12-26T05:40:12+5:302016-12-26T05:40:12+5:30

अ भिनेत्री मनीषा कोईराला कित्येक दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. सध्या ती कुठे आहे याचा पत्ता कुणालाच नाही. मात्र एके काळी आपल्या सुंदरता

Nepali beauty will make Manisha Koirala debut in Bollywood | मनीषा कोईराला नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ही नेपाळी सुंदरी!

मनीषा कोईराला नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ही नेपाळी सुंदरी!

 अ भिनेत्री मनीषा कोईराला कित्येक दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. सध्या ती कुठे आहे याचा पत्ता कुणालाच नाही. मात्र एके काळी आपल्या सुंदरता व अभिनयाने बॉलिवूडवर मोहिणी घालणारी मनीषा कोईराला नंतर आणखी एक नेपाळी बाला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. अभिनयात पीएचडी करणारी मनीषा नेपाळ या देशातून बॉलिवूडमध्ये येणारी पहिली अभिनेत्री होती. तिला बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. मनीषाच्या पावलावर पाऊल देत आणखी एक नेपाळ सुंदर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजते. मीडियात असलेल्या चर्चेनुसार यावर्षी मिस नेपाळ हा खिताब मिळविणारी गरिमा पांडे लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन वेगवेगळ्या निर्मात्यांनी गरिमाला आपल्या चित्रपटासाठी आॅफर दिला आहे. गरिमाला हे तिनही आॅफर आवडले असल्याचे सांगण्यात येते. गरिमा म्हणाली, मला मिळालेले तिनही आॅफर चांगले आहेत. माझी उत्सुकता वाढली असून यावर लवकरच निर्णय घेणार आहे. चर्चेनुसार सर्व काही व्यवस्थित असल्यास २०१७च्या अखेरपर्यंत गरिमा पांडे बॉलिवूड चित्रपटात झळकेल. गरिमा पांडे हिने २०१३ साली ‘नेपाळ वर्ल्ड वाईड ब्युटी कॉन्टेस्ट’ची विजेती ठरली होती. सध्या ती नेपाळी चित्रपट व जाहिरातींमधील आघाडीची अभिनेत्री आहे. दरम्यान गरिमा पांडे हिने पटकथा लेखक सलीम खान यांच्यासोबतचा एक फोटो अपलोड केला असून माझ्या आगामी चित्रपटाची कथा सलीम खान यांनी लिहली आहे असे तिने सांगितले आहे. आता सलिम खानच्या मुलांच्या चित्रपटात ती दिसू शकते असा अंदाज लावला जात आहे. गरिमा पांडेला बॉलिवूडमधून आॅफर देणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा नावाचा अद्याप खुलासा होऊ शकला नाही. यामुळे गरिमा मुंबईत येणार की नाही याबद्दल उत्सुकता लागली आहे.

Web Title: Nepali beauty will make Manisha Koirala debut in Bollywood