बॅन्जो चित्रपटातील नर्गिसचा फर्स्ट लूक

By Admin | Updated: March 17, 2016 01:59 IST2016-03-17T01:59:24+5:302016-03-17T01:59:24+5:30

रवी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाची चर्चा जगजाहीर आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख हटके लूकमध्ये पाहायला मिळायला. रितेशचा बॅन्जो लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

Nargis' First Look in Banjo Movie | बॅन्जो चित्रपटातील नर्गिसचा फर्स्ट लूक

बॅन्जो चित्रपटातील नर्गिसचा फर्स्ट लूक

रवी जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाची चर्चा जगजाहीर आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख हटके लूकमध्ये पाहायला मिळायला. रितेशचा बॅन्जो लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तसेच या चित्रपटाच्या सेटवरची धम्माल, मस्ती सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांतून पाहायला मिळाली. पण, या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी असल्यामुळे या चित्रपटाला चार चाँद लागले आहेत. त्यामुळे साहजिकच तिच्या या बॅन्जो मराठी चित्रपटात कसा लूक असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. अखेर ही उत्सुकता संपली आहे म्हणण्यास हरकत नाही. कारण, नुकताच नर्गिसने स्वत: बॅन्जो या चित्रपटातील लूक आउट केला आहे. यात ती एका वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. कानात हेडफोन, व्हाइट कलरच्या पॅक नेक शर्ट व शॉर्ट्स जीन्स, कमरेला बांधलेल्या लाल जॅकेटमध्ये ती एकदम हटके व बिनधास्त दिसत आहे. तिच्या सोशल मीडियावर केलेल्या स्टेटसवरून कळते की, ती न्यूयॉर्कची डीजे असून कामानिमित्त मुंबईत आली आहे. असो. रितेशप्रमाणे नर्गिसचा हा बॅन्जो लूकदेखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी अपेक्षा करू या.

Web Title: Nargis' First Look in Banjo Movie