माझ्या जन्मावेळी आई गर्भपात करणार होती; कॉमेडी क्वीनचा धक्कादायक गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 16:42 IST2018-06-01T16:42:22+5:302018-06-01T16:42:44+5:30

माझ्या जन्माच्यावेळी आमच्या कुटुंबाच्या परिस्थिती हालाखीची होती.

My mother wanted to abort me says Bharti Singh in a shocking revelation | माझ्या जन्मावेळी आई गर्भपात करणार होती; कॉमेडी क्वीनचा धक्कादायक गौप्यस्फोट

माझ्या जन्मावेळी आई गर्भपात करणार होती; कॉमेडी क्वीनचा धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीतील दीपिका पदुकोण ते कंगना राणावत यासारख्या काही तारकांनी आजपर्यंत आपल्या खासगी जीवनातील धक्कादायक गोष्टी उघड करून चाहत्यांना धक्का दिला होता. आता यामध्ये कॉमेडी क्वीन भारती सिंग हिची भर पडली आहे. भारतीने नुकत्याच टेलिव्हिजनवर झालेल्या एका कार्यक्रमात तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक गोष्ट लोकांना सांगितली.

राजीव खंडेवाल यांच्या  'जज्बात... संगीन से नमकीन तक' या कार्यक्रमात भारतीला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी भारतीने आपल्या जन्माच्यावेळी घडलेला एक प्रसंग प्रेक्षकांना सांगितला. माझ्या जन्माच्यावेळी आमच्या कुटुंबाच्या परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे माझी आई गर्भपात करणार होती. सुदैवाने तिने आपला निर्णय बदलला. परंतु, आज आईला माझा अभिमान वाटतो, असे भारतीने सांगितले. 

माझ्या आयुष्यातील अनेक प्रसंगांमध्ये आईने मला साथ दिली. एकदा माझ्या कार्यक्रमापूर्वी आईची प्रकृती बिघडली होती, तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यामुळे मी कार्यक्रम करू की नको, अशा द्विधा मनस्थितीत होते. त्यावेळी आईनेच मला कार्यक्रमाला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले, अशी आठवणही भारतीने या कार्यक्रमात सांगितली. 

Web Title: My mother wanted to abort me says Bharti Singh in a shocking revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.