"जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं...", मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:33 IST2025-11-24T11:32:59+5:302025-11-24T11:33:44+5:30
'जोगवा' सिनेमातून देवीचे उपासक असलेल्या जोगता आणि जोगतीणींची कथा दाखवण्यात आली होती. समाजाच्या अंधश्रद्धेला बळी पडलेल्या जोगता-जोगतीणीचं आयुष्यावर यातून भाष्य करण्यात आलं होतं. या सिनेमाबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुक्ताने भाष्य केलं.

"जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं...", मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...
मुक्ता बर्वेच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'जोगवा'. २००९ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अभिनेत्रीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या सिनेमात मुक्ताने सुली ही जोगतीणीची भूमिका साकारली होती. तर तिच्यासोबत उपेंद्र लिमये हे प्रमुख भूमिकेत होतं. 'जोगवा' सिनेमातून देवीचे उपासक असलेल्या जोगता आणि जोगतीणींची कथा दाखवण्यात आली होती. समाजाच्या अंधश्रद्धेला बळी पडलेल्या जोगता-जोगतीणीचं आयुष्यावर यातून भाष्य करण्यात आलं होतं. या सिनेमाबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुक्ताने भाष्य केलं.
मुक्ताने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'जोगवा' सिनेमाचा अनुभव सांगितला. मुक्ता म्हणाली, "अॅक्चुली जिथे सौंदत्ती लग्न लागतात तिकडेच आमच्या लग्नाचा सीन शूट केला गेला. आणि तिकडे आसपास आमच्या खरी लग्न सुरू होती. एका पॉइंटला मी राजीवकडे गेले आणि त्याला रिक्वेस्ट केली की आपण हा सीक्वेन्स लवकर संपूया का...कारण मला असह्य होतंय इकडे थांबणं. तिकडे कोणाचं तरी खरंच लग्न लागत होतं. मी तर अभिनय करत होते. ते उद्यापासून जोगते जोगतीण असणार होते आणि त्यांचं आयुष्य आता त्यांच्या हातात राहणार नव्हतं. त्या रुढी आणि परंपरांविषयी मला वाईट बोलायचं नाहीये. पण, त्या अंधश्रद्धेमुळे काही लोकांची आयुष्य ही कायमची कोमेजली".
"एक जोगता होता आमच्यासोबत... त्याला यातून बाहेर पडायचं होतं. साडी नेसलेला होता तो मध्येमध्ये लेंगा घालायचा... पण तो म्हणाला आता मी बाहेर नाही पडू शकत... माझं अर्ध्याहून जास्त आयुष्य गेलं. मला तेच वाटतं की आता मी कदाचित तितकी बरी दिसणार नाही. जितकी मी तेव्हा दिसले होते. वयामुळे नाही पण समजतीमुळेच गडबड होईल. तुमच्या एका निरागस आयुष्याची वाट लागतानाची गोष्ट निरागस डोळ्यातूनच बाहेर येऊ शकते", असंही मुक्ताने सांगितलं.