वर्दीशी प्रामाणिक असलेला डॅशिंग अधिकारी! माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे'मध्ये भाव खाऊन गेला सिद्धार्थ चांदेकर
By कोमल खांबे | Updated: December 30, 2025 17:11 IST2025-12-30T17:08:50+5:302025-12-30T17:11:09+5:30
माधुरी दीक्षितचा अभिनय पाहून चाहते थक्क झाले आहेत. पण, माधुरीच्या 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये मराठमोळा सिद्धार्थ चांदेकर भाव खाऊन गेला आहे.

वर्दीशी प्रामाणिक असलेला डॅशिंग अधिकारी! माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे'मध्ये भाव खाऊन गेला सिद्धार्थ चांदेकर
ओटीटीवर नुकत्याच रिलीज झालेल्या 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजची प्रचंड चर्चा आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहे. माधुरीने या सीरिजमध्ये सिरीयल किलरची भूमिका साकारली आहे. माधुरी दीक्षितचा अभिनय पाहून चाहते थक्क झाले आहेत. पण, माधुरीच्या 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये मराठमोळा सिद्धार्थ चांदेकर भाव खाऊन गेला आहे.
'मिसेस देशपांडे'मध्ये सिद्धार्थची डॅशिंग भूमिका
'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये माधुरी दीक्षितसोबत सिद्धार्थही मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये त्याने ACP तेजस फडकेची भूमिका साकारली आहे. वर्दीशी प्रामाणिक, जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेला डॅशिंग अधिकारी सिद्धार्थने साकारला आहे. मुंबईत एकामागोमाग एक होणाऱ्या खूनांचं कनेक्शन सीरियल किलर असलेल्या मिसेस देशपांडेशी आहे. या सायको किलरला पकडण्यात ७ खून केलेली मिसेस देशपांडे पोलिसांना मदत करते. पण, यामागेही तिचा काही छुपा हेतु आहे. जो शोधण्याचा तेजस फडके प्रयत्न करताना या सीरिजमध्ये दिसतो.
सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली तेजस फडकेची भूमिका छाप पाडून जाते. या सीरिजमध्ये त्याने अॅक्शन, ड्रामासह रोमान्सही केलेला आहे. सिद्धार्थने साकारलेला तेजस फडके 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये माधुरीसोबत भाव खाऊन गेला आहे. या सीरिजमध्ये माधुरीप्रमाणेच त्याचंदेखील महत्त्वाचं पात्र असल्याने सिद्धार्थची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून जाते. सिद्धार्थचा डिटेक्टिव्ह ऑफिसरच्या भूमिकेतील डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळेच सिद्धार्थच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
कुठे पाहाल 'मिसेस देशपांडे'?
माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत प्रदीप वेलणकर, उमाकांत पाटील, सुलक्षणा जोगळेक हे मराठी कलाकारही झळकले आहेत. जिओ हॉटस्टारवर 'मिसेस देशपांडे'चा पहिला सीझन १९ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला आहे. ही वेब सीरिज हिंदीमध्ये असून पहिल्या सीझनमध्ये ६ भाग आहेत.