मोनालिसा करणार झाला बोभाटा

By Admin | Updated: January 1, 2017 03:58 IST2017-01-01T03:58:10+5:302017-01-01T03:58:10+5:30

सध्या अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला बोभाटा’ या चित्रपटाची चर्चा खूपच रंगत आहे. कारण नुकताच बॉलिवूडचा तगडा दिग्दर्शक रोहित शेट्टी याने हा चित्रपट प्रदर्शित होण्याचपूर्वीच

Monalisa will be bobhata | मोनालिसा करणार झाला बोभाटा

मोनालिसा करणार झाला बोभाटा

सध्या अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला बोभाटा’ या चित्रपटाची चर्चा खूपच रंगत आहे. कारण नुकताच बॉलिवूडचा तगडा दिग्दर्शक रोहित शेट्टी याने हा चित्रपट प्रदर्शित होण्याचपूर्वीच झाला बोभाटाचा रिमेक करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटात अभिनेत्री मोनालिसा बागल आणि मयूरेश पेम हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाविषयी अभिनेत्री मोनालिसा बागल लोकमत सीएनएक्सला सांगते, खरं तर माझा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी मी शशी देवधर या चित्रपटामध्ये सई ताम्हणकर हिचे बालपण साकारलं होतं. नंतर मी शिक्षणामुळे इंडस्ट्रीपासून काही दिवस दूर होते. आता मात्र या चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे. मुख्य भूमिकेत मी पहिल्यांदाच झळकणार आहे. या चित्रपटात मी प्रिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. ही मुलगी ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय परिवारातील आहे. ती एका मुलाच्या प्रेमात पडते. मात्र घरच्यांसमोर आपल्या प्रेमाविषयी सांगण्यास थरथरते. कारण तिच्या घरात आधीच बोभाटा सुरू असतो, त्यामुळे पुन्हा हा बोभाटा निर्माण व्हायला नको, म्हणून ती घाबरते. नक्की हा बोभाटा कशा प्रकारचा असणार आहे, हे प्रेक्षकांना ६ जानेवारीला चित्रपटगृहात जाऊन पाहावे लागणार आहे. या चित्रपटात मोनालिसासोबत दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय कापरे, कमलेश सावंत, दीपाली अंबिकार, तेजा देवकर, रोहित चव्हाण, संग्राम साळवी या कलाकारांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: Monalisa will be bobhata