बॉलिवूड गायक अभिजीतविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

By Admin | Published: October 23, 2015 08:53 AM2015-10-23T08:53:41+5:302015-10-23T09:08:41+5:30

बॉलिवूडचा गायक अभिजीत भट्टाचार्यवर एका महिलेने छेडछाडीचा आरोप करत त्याच्याविरोधात पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली अाहे.

Molestation complaint against Bollywood singer Abhijit | बॉलिवूड गायक अभिजीतविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

बॉलिवूड गायक अभिजीतविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ - विविध मुक्ताफळे उधळत वाद ओढवून घेणारा बॉलिवूडचा गायक अभिजीत भट्टाचार्य विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने तो पुन्हा एकदा वादात अडकला आहे. एका ३४ वर्षीय महिलेने अभिजीतवर छेडछाडीचा आरोप करत गुरीवारी रात्री त्याच्याविरोधात ओशिवरा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील लोखंडवाला परिसरात अबिजीतने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे महिलेने म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला लोखंडवाला येथील दुर्गोत्सवाच्या मंडपात गायक कैलाश खेरचा शो पाहण्यासाठी अाली होती. यावेळी मंडपात खूप गर्दी असल्याने ती महिला सीटवर उभी राहून तो कार्यक्रम पाहत होती. त्याचवेळी जवळच उभ्या असलेल्या अभिजीतने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मात्र महिलेने त्याला विरोध करत जाब विचारला असता अभिजीतने तिला सर्वांसमोर जोरात शिवीगाळ केली. 

त्यानंतर मंडपातील महिला कार्यकर्त्यांनी अभिजीतला निघून जाण्यास सांगितले. मात्र याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी अभिजीतने मला दिली, असा आरोप करत त्या महिलेने अभिजीत व त्याच्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी कलम ३५४ अ, ५०६ आणि ३६ अंतर्गत अभिजीतवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: Molestation complaint against Bollywood singer Abhijit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.