बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक; फायनलपूर्वीच काढून टाकले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 13:33 IST2024-11-14T13:32:01+5:302024-11-14T13:33:18+5:30
पॅरिस ऑलिम्पिकवेळीही एका खेळाडूवर बॉयफ्रेंडसोबत फिरत असल्याने कारवाई करण्यात आली होती. आताही तशीच कारवाई याही स्पर्धेत करण्यात आली आहे.

बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक; फायनलपूर्वीच काढून टाकले...
सध्या सुरु असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत पनामाच्या सुंदरीला विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. स्पर्धेवेळी बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या रुममध्ये सापडल्याने तिच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढविली आहे. तर या सुंदरीने स्पर्धेच्या संचालकासोबत वाद झाल्याने आपल्याला काढून टाकण्यात आल्याचा दावा केला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकवेळीही एका खेळाडूवर बॉयफ्रेंडसोबत फिरत असल्याने कारवाई करण्यात आली होती. आताही तशीच कारवाई याही स्पर्धेत करण्यात आली आहे. पनामाची सुंदरी इटली मोरा हिच्याबाबत हा प्रकार घडला आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार मोराला तिच्या खासगी कारणाम्यांमुळे बाहेर करण्यात आले आहे. आयोजकांची परवानगी न घेता ती बॉयफ्रेंडला वेगळ्या रुममध्ये भेटल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
मोरा ही तिचा बॉयफ्रेंड जुआन अबादिया याच्यासोबत वेगळ्या हॉटेलच्या खोलीत राहत होती. अंतिम फेरीच्या काही दिवस आधीच ही कारवाई झाल्याने युनिव्हर्स स्पर्धेतील स्पर्धकांमध्ये खळबळ उडाली आहे. स्पर्धेच्या खराब आयोजनावरून तिचे आणि स्पर्धेच्या आयोजक सीजर एनेल रोड्रिग्जमध्ये बिनसले होते. यामुळे डिसक्वालिफाय केल्याचा आरोप मोराने केला आहे.
अबादिया या चर्चेवेळी तिथे उपस्थित होता. त्याने पनामा संघटनेच्या चुकीमुळे आपण ७००० डॉलरच्या कॅरोलिना हेरेरा ड्रेससह इतर खर्च उचलल्याचे तिथे सांगितले. यावरून आयोजकांना राग आला आणि त्यांनी मला त्याच्यासोबत असल्याचे कारण देत स्पर्धेतून बाहेर केल्याचे मोराने म्हटले आहे. तो तिथे नसता तर परिस्थिती आणखी बिघडली असती, असेही मोराने म्हटले आहे.
तर दुसरीकडे मिस यूनिवर्स ऑर्गनाइजेशनने मोरा बॉयफ्रेंडसोबत राहत असल्याची पूर्ण चौकशी करण्यात आली व त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचा खुलासा केला आहे. मोरा बाहेर पडल्याने मिस पनामा ऑर्गनाइजेशन पनामाकडून कोणतीही सुंदरी या स्पर्धेला पाठविणार नाही.