टॉलिवूडमध्येही मराठी मुलींची चलती

By Admin | Published: July 19, 2015 04:10 AM2015-07-19T04:10:35+5:302015-07-19T05:48:32+5:30

बॉलिवूडच्या बरोबरीने जर कोणी टक्कर देत असेल तर ते टॉलिवूड. जितकी उत्सुकता एखाद्या बिग बजेट बॉलिवूड चित्रपटाविषयी असते, तितकीच उत्सुकता

Marathi girls also run in Tollywood | टॉलिवूडमध्येही मराठी मुलींची चलती

टॉलिवूडमध्येही मराठी मुलींची चलती

googlenewsNext

बॉलिवूडच्या बरोबरीने जर कोणी टक्कर देत असेल तर ते टॉलिवूड. जितकी उत्सुकता एखाद्या बिग बजेट बॉलिवूड चित्रपटाविषयी असते, तितकीच उत्सुकता टॉलिवूड चित्रपटाविषयीही पाहायला मिळते. बजेट तर काय बॉलिवूडहूनही जास्त. टॉलिवूड हे फक्त साऊथपुरतेच मर्यादित न राहता या इंडस्ट्रीने जगभरात आपली छबी उमटवली आहे.
जगाला भुरळ घालणाऱ्या साऊथची ओढ महाराष्ट्रीयन कलाकारांनाही लागली आहे. मराठीत गाजलेले सायाजी शिंदे, रवी काळे, नागेश भोसले, मिलिंद गुणाजी, अशोक समर्थ यांनाही साऊथमध्ये व्हिलन म्हणून डिमांड आहे. ‘कलेतून मिळणाऱ्या समाधानापेक्षा पैसाही महत्त्वाचाच,’ असे काहीसे मत या कलाकारांचे आहे. आता या स्पर्धेत आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीही मागे कशा राहतील? आता अनेक मराठमोळ्या मुली साऊथमध्ये नाव कमवत आहेत. ‘अगं बाई अरेच्चा’च्या
सोनाली कुलकर्णीने कन्नड चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते.
‘राधा ही बावरी’ या मराठी मालिकेमध्ये राधाची भूमिका साकारून वेगळी ओळख निर्माण केलेल्या श्रुती मराठेने नाटकातून हेमामालिनी या नावाने साऊथच्या सिनेमात पदार्पण केले. त्यानंतर आपले नाव बदलून तिने श्रूती प्रकाश करून घेतले. या नावानेच ती साऊथमध्ये ओळखली जाते. ‘इंदिरा विझा’ हा तिचा साऊथमधील पहिला चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला. ‘नान अवनीलायी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगलीच कमाई केली. तसेच, गुरु-शिष्य सथ्यराज, सुंदर सी. हे तिचे साऊथमधील काही चित्रपट. नेहा पेंडसे हिने मराठी इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करून साऊथमध्येही पदार्पण केले. ‘असीमा’ हा तिचा पहिला साऊथमधील चित्रपट २००९मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘ट्रीम्स’, ‘मेड इन यूएसए’, ‘स्वामी’, ‘विधी राऊडी’, ‘सोन्यम’ यासारखे अनेक चित्रपट तिने साऊथमध्ये केले. साऊथमधील चारही भाषांमध्ये तिने काम केले आहे. नेहा म्हणते, ‘‘साऊथच्या चित्रपटांना स्थानिकांचा चांगला पाठिंबा मिळतो. याशिवाय, तेथील इंडस्ट्री चांगल्या अर्थाने खूप प्रोफेशनल आहे. त्यामुळे कामाचे समाधान मिळते.’’
रेणू देसाई चांगले तेलुगू बोलत असल्याने तीही साऊथच्या चित्रपटात काम करीत आहे. शंकर महादेवनच्या ‘ब्रेथलेस’मध्ये ती पहिल्यांदा झळकली. नंतर ‘बदरी’, ‘जॉन्ही’ (२०००-२००३). सध्या ती मराठी सिनेमांच्या निर्मितीकडे वळाली आहे. ‘मितवा’ आणि ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमांमुळे नेहा महाजन हिला आपण ओळखतो. तिनेही दिग्दर्शक संतोष बाबू व सभीश बाबू यांच्या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Web Title: Marathi girls also run in Tollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.