झिप-याचे चित्रीकरण झाले रेल्वेस्टेशनवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 14:18 IST2016-11-19T14:18:30+5:302016-11-19T14:18:30+5:30
झिप-या या आगामी मराठी चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे मुंबईतील विविध रल्वेस्टेशन्सवर झाले असल्याचे समजतेय. ...

झिप-याचे चित्रीकरण झाले रेल्वेस्टेशनवर
झिप-या या आगामी मराठी चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे मुंबईतील विविध रल्वेस्टेशन्सवर झाले असल्याचे समजतेय. झिपºया या चित्रपटात आपल्याला अनेक कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत. अमृता सुभाष, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, हंसराज जगताप या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. अमृता सुभाष यांची या चित्रपटातील भूमिका फारच महत्वपुर्ण असल्याचे कळतेय. या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना प्रथमेश सांगतो, झिपºया मधील माझी भूमिका फारच वेगळी आहे. या चित्रपटामधील माझी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच सरप्राईज करेल. अमृता ताईसोबत काम करताना तर खुपच शिकायला मिळाले. डबिंगच्या वेळी तर तिने चार-पाच दिवसातच काम संपवले यावरुनच त्यांचा प्रगल्भ अनुभव समजतो. सेटवर मजा देखील आम्ही तेवढीच केली. या चित्रपटाचे शूटिंग केव्हा संपले मला समजलेच नाही. आमचे दिग्दर्शक केदार वैदय यांच्या सोबत मला खरच आता पुन्हा पुन्हा काम करण्याची इच्छा झाली आहे. आम्ही अनेक सीन्स नेव्ही एरिया आणि रेल्वे स्टेशनवरच शूट केले असल्याचेही प्रथमेशने सांगितले. तर अभिनेता हंसराजने देखील या चित्रपटातील त्याचा अनुभव सीएनएक्स सोबत शेअर केला. हंसराज सांगतो, आम्ही सेटवर फारच धमाल मस्ती करायचो. मला प्रथमेश आणि सक्षम नेहमीच सांभाळून घ्यायचे. सक्षमने मला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. भूमिका निवडताना जरा च्युझी असले पाहिजे असे मला सक्षमनेच सांगितले आहे. या संपूर्ण टिमसोबत काम करताना बरेच काही शिकायला मिळाल्याचे हंसराजने सांगितले.
![]()