गश्मीरचा हा बालपणीचा फोटो तुम्हालाही नक्कीच आवडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 15:24 IST2017-08-24T09:54:40+5:302017-08-24T15:24:40+5:30

बालपणीचे फोटो हे प्रत्येकासाठी खास असतात.लहानपण देगा देवा म्हणत पुन्हा लहान होऊन सगळे एन्जॉय करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. बालपणीचे ...

You will surely like this photo of Gashmir's childhood! | गश्मीरचा हा बालपणीचा फोटो तुम्हालाही नक्कीच आवडेल!

गश्मीरचा हा बालपणीचा फोटो तुम्हालाही नक्कीच आवडेल!

लपणीचे फोटो हे प्रत्येकासाठी खास असतात.लहानपण देगा देवा म्हणत पुन्हा लहान होऊन सगळे एन्जॉय करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. बालपणीचे ते क्षण पुन्हा एकदा अनुभवणं शक्य नसले तरी फोटोच्या माध्यमातून ते क्षण आपण पुन्हा पुन्हा जगत असतो. त्यामुळे बालपणीच्या फोटोंचं प्रत्येकाच्या मनात एक वेगळे स्थान असते.बालपणीचा गोंडस अवतार, खट्याळ आणि खोडकर अदा,धम्माल मस्ती सगळी फोटोत कैद असेल तर क्षणात त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोरुन जातात.त्यामुळे बालपणीच्या फोटोचं एक वेगळे महत्त्व असते. त्यात बालपणीचे फोटो हे सेलिब्रिटींचे असतील तर त्याला विशेष महत्त्व प्राप्त होतं. सेलिब्रिटी आपले बालपणीचे फोटो कायमच विविध माध्यमातून आपल्या फॅन्सशी शेअर करत असतात.सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बालपणाचे ते क्षण आपल्या फॅन्ससह शेअर करणं सेलिब्रिटींना भावतं.असाच एक फोटो आहे अभिनेता गश्मीर महाजनीचा या फोटोमध्ये गश्मीरचा बालपणीचा अवतार कुणालाही मोहून टाकेल.गुटगुटीत असा गश्मीरचा हा अवतार या फोटोत पाहायला मिळत आहे. सध्या आपल्या बॉडीने आणि तरुणींना घायाळ करणारा गश्मीरचा अंदाज पाहायला मिळतो.मात्र त्याचा बालपणीचा हा अवतार पाहून तरुणी त्याच्यावर लट्टू झाल्याशिवाय राहणार नाहीत. या फोटोत गश्मीरसह त्याची बहिणही दिसत आहे.भावाबहिणीचे प्रेमही या फोटोत पाहायला मिळत आहे.त्यामुळे गश्मीरचा हा फोटो त्याच्या फॅन्समध्ये आणि तरुणींमध्ये विशेष पसंतीस पात्र ठरला आहे.मुस्कुराके देख जरा हिंदी सिनेमातून गश्मीरने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.यानंतर कॅरी ऑन मराठा, देऊळबंद, कान्हा अशा विविध सिनेमांच्या माध्यमातून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.

Web Title: You will surely like this photo of Gashmir's childhood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.