अभिजीत खांडकेकर आणि सुखदाची 'प्यार वाली Love story' वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 07:00 AM2021-02-01T07:00:00+5:302021-02-01T07:00:00+5:30

अभिजीत खांडकेकरनंच सुखदाला प्रपोज केलं. सुखदाने हे अभिजीतचे हे प्रपोज स्वीकारलं दोघंही रेशीमगाठीत अडकले.

You will also be surprised to Read Abhijeet Khandkekar And Sukhada Khandkekar Love Story | अभिजीत खांडकेकर आणि सुखदाची 'प्यार वाली Love story' वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

अभिजीत खांडकेकर आणि सुखदाची 'प्यार वाली Love story' वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

googlenewsNext

अभिजीतचं अभिनेत्री सुखदा देशपांडे हिच्याशी लग्न झालं आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. 1 फेब्रुवारी 2013 रोजी अभिजीत आणि सुखदा यांचं लग्न मोठ्या थाटात पार पडले होते.हे लग्न अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. दोघांची लव्ह स्टोरीही स्पेशल आहे. सोशल मीडियावरुन दोघांची एकमेकांशी ओळख झाली. फेसबुकच्या माध्यमातून दोघं पहिल्यांदा भेटले. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही मूळचे नाशिकचे.

अभिजीतचा नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची एकमेकांशी ओळख होती. मात्र दोघं कधीही एकमेकांशी बोलले नव्हते. त्याच काळात अभिजीतची माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमुळे अभिजीत रसिकांचा लाडका बनला होता. ही मालिका पाहून सुखदाने फेसबुकवर अभिजीतचं कौतुक केले होते. 

नाशिकचा मुलगा मालिकेत एवढं चांगलं काम करतो आहेस, हे कौतुकास्पद आहे अशा शब्दांत सुखदाने फेसबुकवर अभिजीतवर स्तुतीसुमनं उधळली होती. यानंतर अभिजीत आणि सुखदा यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. यानंतर एकमेकांचा विचार करायला हरकत नाही अशा शब्दांत अभिजीतनंच सुखदाला प्रपोज केलं. सुखदाने हे अभिजीतचे हे प्रपोज स्वीकारलं  दोघंही रेशीमगाठीत अडकले.

 नाशिकमध्ये अभिजीत आणि सुखदाचं शुभमंगल मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 
 छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'ध्यानीमनी', 'भय', 'ढोलताशे' या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात. दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ. अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. 

'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. 

Web Title: You will also be surprised to Read Abhijeet Khandkekar And Sukhada Khandkekar Love Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.