यंदाच्या पिफची पर्यावरण थीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 19:17 IST2017-01-05T19:17:49+5:302017-01-05T19:17:49+5:30

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 12 ते 19 जानेवारी दरम्यान ...

This year's eco-friendly theme | यंदाच्या पिफची पर्यावरण थीम

यंदाच्या पिफची पर्यावरण थीम

णे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 12 ते 19 जानेवारी दरम्यान होणार असून प्रेक्षकांना चित्रपटांसोबत अनेकविध कार्यशाळा, चर्चासत्र, प्रदर्शन यांचा अंर्तभावही या महोत्सवात असेल अशी  माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी  पत्रकार परिषदेत दिली. 
यावर्षी पर्यावरण या संकल्पनेवर आधारीत महोत्सव असणार आहे. आणि या यासंबंधीचे बोधचिन्हाने अनावरणही पत्रकार परिषदे दरम्यान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व महोत्सवाचे उपाध्यक्ष समर नखाते, सचिव रवी गुप्ता, विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विठ्ठल मणियार, सतीशआळेकर, मकरंद साठे आदी मान्यवर उपस्थित होते. 
महोत्सवाबद्दल माहिती सांगताना  जब्बार पटेल म्हणाले, यंदाच्या वर्षी सेव द अर्थ, इट्स द ओन्लीप्लॅनेट दॅट मेक्स फिल्मस ही थीम असून चित्रपट आणि करमणूकीच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करून निसर्ग पयार्याने पृथ्वीचे रक्षण करणे हे आमचे ध्येय आहे. यावर्षी 95 देशांमधून तब्बल 1000 हून जास्त चित्रपटांनी आपला सहभाग नोंदविला आहे. तेसच यावेळी विविध चित्रपट विभाग करण्यात आले असून त्यात फोकस विभाग, स्पर्धात्मक विभाग, ग्लोबल विभाग व अदर्स विभाग याचा सामावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी ग्रेशिया लॉर्सा यांच्या साहित्यावर आधारीत चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच ट्रीब्युट, चित्रपटांतील स्पॅनिशडान्स प्रकारात बनलेल्या कलाकृती ही प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रातिनिधिक नोंदणी प्रक्रियेची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Web Title: This year's eco-friendly theme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.