उमेश कामतसाठी खास ठरला यंदाचा ख्रिसमस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 18:16 IST2016-12-21T18:16:20+5:302016-12-21T18:16:20+5:30
प्रत्येकाला ख्रिसमस उत्सावाची चाहूल लागली आहे. सर्वजण या उत्सावाच्या तयारीला लागले असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जागोजागी चर्चदेखील लाइटच्या ...
.jpg)
उमेश कामतसाठी खास ठरला यंदाचा ख्रिसमस
प रत्येकाला ख्रिसमस उत्सावाची चाहूल लागली आहे. सर्वजण या उत्सावाच्या तयारीला लागले असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जागोजागी चर्चदेखील लाइटच्या माळांनी झगमगाटाने उजळून निघाले आहेत. त्याचबरोबर ख्रिसमस ट्रीदेखील सजवले असल्याचे दिसत आहे. अशा या ख्रिसमस ट्रीसोबत प्रत्येकाची फोटो काढण्याची लगबग चालू आहे. मात्र प्रेक्षकांचा लाडका कलाकार उमेश कामत याच्यासाठी यंदाचा ख्रिसमस खूपच खास ठरला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण उमेशने नुकतेच मुंबई येथील फेसबूक मुख्य आॅफीसमधील काही फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. त्याचे या फोटोला फेसबूक आॅफीसमधील ख्रिसमस ट्रीच्या सजावटने चार चाँद लागले आहेत. त्याचबरोबर त्याने आॅफीसमध्ये केकदेखील कट केला आहे. त्यामुळे उमेश खूपच आनंदात असल्याचे फोटोच्या माध्यमातून दिसत आहेत. तसेच त्याने आपल्या फोटोसहित एक पोस्टदेखील अपडेट केली आहे. तो आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतो, माझा यंदाचा ख्रिसमस माझ्यासाठी खूपच खास ठरला आहे. तसेच फेसबूक आॅफीसमधील हा अनुभव माझ्यासाठी खरचं खूपच छान होता. त्याचबरोबर त्याने या भेटीसाठी सपना पटेल आणि श्वेता शेट्टी यांचे आभारदेखील मानले आहे. यापूर्वीदेखील सई ताम्हणकर, प्रि़या बापट, संजय जाधव, चिराग पाटील, भूषण पाटील अशा अनेक कलाकारांनी या आॅफीस भेट दिल्या आहेत. मात्र उमेशसाठी ही भेट अविस्मरणीय ठरली आहे. उमेशने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याने टाइम प्लीज, अजब लग्नाची गजब गोष्ट, लग्न पाहावे करून, बालकडू असे अनेक चित्रपट मराठी चित्रपटसृष्ट्रीला दिले आहेत.
![]()