'क्लब ५२' चित्रपटातून यशश्री व्यंकटेशचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:07 PM2023-12-11T17:07:19+5:302023-12-11T17:07:29+5:30

Yashashree Vyankatesh : यशश्रीच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला एक ग्लॅमरस चेहरा मिळाला आहे. यशश्री क्लब ५२ चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी सोबत ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Yashshree Venkatesh made his debut in Marathi cinema with the movie 'Club 52' | 'क्लब ५२' चित्रपटातून यशश्री व्यंकटेशचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

'क्लब ५२' चित्रपटातून यशश्री व्यंकटेशचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे.  अशा दर्जेदार चित्रपटांतून दर्जेदार कलाकार ही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. आता आणखी एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे यशश्री व्यंकटेश (Yashashree Vyankatesh). ती क्लब ५२ (Club 52)  चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यशश्रीच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला एक ग्लॅमरस चेहरा मिळाला आहे. यशश्री क्लब ५२ चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी सोबत ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

करिअरच्या सुरवातीला दिग्गज कलाकारांसोबत काम करताना थोडस दडपण होते. मात्र यशश्रीचे वडील व्यंकटेश उर्फ ​​बजरंग बादशाह हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाल्याने ते दडपण ही तिचे नाहीसे झाले. याच बरोबर तिच्या हातात मराठी आणि हिंदीतील मोठे चित्रपट आहेत. या चित्रपट तिने मुख्य भूमिकेशिवाय दोन गाणी देखील आदर्श शिंदे सोबत गायली आहेत. नभ बरसे रे आणि गुडनाईट असे गाण्याचे बोल आहेत. 

यशश्री ही एक उत्तम गायिका तसेच नृत्यांगना आहे. तिने बहुचर्चित ड्रीम गर्ल सारख्या चित्रपटांमध्ये मित ब्रोस सोबत संगीत सहाय्यक म्हणून काम केले आहे.  तिने किया किया २.० नाना पाटेकर आणि अनिल कपूर अभिनीत वेलकम मधील किया कियाचा रिमेक गाणे देखील गायले आहे. हा चित्रपट बजरंग बादशाह यांनी लिहिला असून संगीत करण आणि दर्शन दासरी यांचे आहे.

Web Title: Yashshree Venkatesh made his debut in Marathi cinema with the movie 'Club 52'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.