यशश्री व्यंकटेश आणि हार्दिक जोशीची भन्नाट केमिस्ट्री 'क्लब ५२' चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 06:19 PM2023-12-19T18:19:17+5:302023-12-19T18:19:46+5:30

Club 52 Movie : 'क्लब ५२' या चित्रपटातून यशश्री व्यंकटेशने मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण केले आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला आहे.

Yashshree Venkatesh and Hardik Joshi's amazing chemistry in the movie 'Club 52' | यशश्री व्यंकटेश आणि हार्दिक जोशीची भन्नाट केमिस्ट्री 'क्लब ५२' चित्रपटात

यशश्री व्यंकटेश आणि हार्दिक जोशीची भन्नाट केमिस्ट्री 'क्लब ५२' चित्रपटात

अभिनेत्री यशश्री व्यंकटेश आणि हार्दिक जोशी ही जोडी सध्या रसिकांची पसंतीस उतरली असून क्लब ५२ या चित्रपटातून यशश्री व्यंकटेशने मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण केले आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. यातील अभिनेत्री यशश्री व्यंकटेश आणि हार्दिक जोशीची भन्नाट केमिस्ट्री जमली आहे. त्यामुळे यशश्री - हार्दिकची जोडी हिट अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे या यशाने यशश्री भारावून गेली आहे. ती रसिकांचे आभार मानते.

या चित्रपटात यशश्रीवरती चित्रित करण्यात आलेली लावणी साताऱ्याला गेली मी, सांगलीला गेली मी.. मला पाहू नका वरखाली, मी आहे तमाशेवाली... 
ही लावणी प्रसिद्ध गायिका रेश्मा सोनवणे यांनी गायली असून संगीत - करण आणि दर्शन, गीतकार - सुजाता पवार हे आहेत. सध्या ही लावणी ट्रेंडिंगमध्ये आहे. बाकीची मंत्रमुग्ध करणारी गीते आदर्श शिंदे, मधुर शिंदे, यशश्री व्यंकटेश, चंद्रकला दासरी यांनी गायली आहेत. तर गीतकार बजरंग बादशहा, अजय वाघमारे, सुजाता पवार यांनी ही गीते लिहली आहेत. या चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, राधा सागर, भरत ठाकूर आणि टीना सोनी हे आहेत.

क्लब ५२ या अ‍ॅक्शन थ्रिलर हा चित्रपट बजरंग बादशाह यांनी लिहिला असून संगीत करण आणि दर्शन दासरी यांचे आहे. यशश्री ही एक उत्तम गायिका तसेच नृत्यांगना आहे. तिने बहुचर्चित ड्रीम गर्ल सारख्या चित्रपटांमध्ये मित ब्रोस सोबत संगीत सहाय्यक म्हणून काम केले आहे. तिने किया किया २.० नाना पाटेकर आणि अनिल कपूर अभिनीत वेलकम मधील किया कियाचा रिमेक गाणे देखील गायले आहे.
 

Web Title: Yashshree Venkatesh and Hardik Joshi's amazing chemistry in the movie 'Club 52'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.