आयुष्य बदलणारी 'यारी दोस्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 14:12 IST2016-07-23T08:42:57+5:302016-07-23T14:12:57+5:30

जगात सर्वात श्रेष्ठ कोणते नाते असते ते म्हणजे मैत्रीचे. आई, वडील, भाऊ-बहीण या नात्यांपेक्षा आपण सर्वाधिक वेळ मित्रांसोबतच घालवत असतो. म्हणूनच आपल्या 'दोस्ताचे' आयुष्यात खूप महत्त्व आहे. योग्य वयात मिळालेल्या योग्य मित्रांच्या साथीने आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरणारी मैत्री 'यारी दोस्ती' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे.

'Yari Dosti', who changes life | आयुष्य बदलणारी 'यारी दोस्ती'

आयुष्य बदलणारी 'यारी दोस्ती'

 
गात सर्वात श्रेष्ठ कोणते नाते असते ते म्हणजे मैत्रीचे. आई, वडील, भाऊ-बहीण या नात्यांपेक्षा आपण सर्वाधिक वेळ मित्रांसोबतच घालवत असतो. म्हणूनच आपल्या 'दोस्ताचे' आयुष्यात खूप महत्त्व आहे. योग्य वयात मिळालेल्या योग्य मित्रांच्या साथीने आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरणारी मैत्री 'यारी दोस्ती' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. शांतनु अनंत तांबे लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचे नुकतेच मोशन पोस्टर आणि टीजर सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले. चार मुलं यांच्या 'यारी दोस्ती'वर आधारित हा चित्रपट आहे. दोन शिक्षित, अभ्यासू तर इतर दोन अशिक्षित सडकछाप मुले पाहायला मिळतात. ही चौघे जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा काय काय धम्माल होते ते 'यारी दोस्ती' या चित्रपटात अनुभवता येणार आहे. बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट निर्मित 'यारी दोस्ती' हा चित्रपट आहे. हंसराज जगताप हा मुख्य भूमिकेत आहे.आकाश वाघमोडे,आशिष गाडे, सुमित भोकसे, श्रेयस राजे हे कलाकार पदार्पणास सज्ज आहे.  यांच्यासोबतच मिताली मयेकर,संदीप गायकवाड, निशा परुळेकर, अशोक पावडे, नम्रता जाधव आणि जनार्दन सिंग यांच्याही  भूमिका पहायला मिळणार आहे. 

Web Title: 'Yari Dosti', who changes life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.