उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 14:02 IST2017-01-03T14:02:40+5:302017-01-03T14:02:40+5:30
नवोदित कलाकारांना व्यासपाठी मिळावे यासाठी उमेश कुलकर्णी यांनी यंदा ही शूट अ शॉर्ट या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. हे ...

उमेश कुलकर्णी यांची कार्यशाळा
न ोदित कलाकारांना व्यासपाठी मिळावे यासाठी उमेश कुलकर्णी यांनी यंदा ही शूट अ शॉर्ट या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. हे त्यांच्या कार्यशाळेचे पाचवे वर्ष आहे. या कार्यशाळेमध्ये उमेश कुलकर्णी आणि प्राध्यापक समर नखाते स्वत: मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा प्रामुख्याने मराठी भाषेत आयोजित करण्यात येणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे चित्रपट बनवणे हि गोष्ट तांत्रिकदृष्टया जरी सोपी झाली असली तरी एक कलामाध्यम म्हणून लघुपट तयार करणे हि आव्हानात्मक गोष्ट आहे. लघुपट निर्मितीसाठी केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नसून लघुपटाची मूलभूत संकल्पना, लघुपटाकडे कला व माध्यम म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन याही बाबी उत्तम कलानिर्मितीसाठी आवश्यक असतात. लघुपट करण्याची इच्छा असणाºयांना या कार्यशाळेत लघुपट निर्मिती प्रक्रियेबाबत सर्वसमावेशक असे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच लघुपटाचा संकल्पना ते निर्मिती पर्यंतचा प्रवास, लघुपट निर्मितीसाठीचीआवश्यक पूर्व तयारी, शुटींगची प्रकिया तसेच कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासोबतची कार्यपद्धती, लघुपटाचे संकलन, म्हत्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, चित्रपटनिर्मितीशी निगडीत असलेलीइतर कलाक्षेत्र यावर सखोल चर्चा कार्यशाळेत करण्यात येणार आहे. गिरणी या लघुपटासाठी उमेश कुलकर्णी याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळविला. तसेच वळू,विहीर, देऊळ आणि हायवे असे अनेक सुपरहीट चित्रपटदेखील त्याने केले आहे. आजपर्यंत त्याने दहा लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर उमेशने 'क्लेरमो फॅरो थाय' आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, केरळ येथील आंतरराष्ट्रीय माहितीपट आणि लघुपट महोत्सव अशा अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात ज्युरी सदस्य म्हणूनही स्थान भूषविले आहे. तर त्याच्या २००८ साली बनविलेल्या गारूड या लघुपटासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण शंख पुरस्कार बहाल करण्यात आला होता.