आर्ची पुन्हा का झाली सैराट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:44 IST2016-10-27T16:44:14+5:302016-10-27T16:44:14+5:30

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तर या चित्रपटातील आर्ची ...

Why Archie again? | आर्ची पुन्हा का झाली सैराट ?

आर्ची पुन्हा का झाली सैराट ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तर या चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिने प्रत्येकाला वेडं लावले आहे. हीच आर्ची आता पुन्हा सैराट बनण्यासाठी सज्ज झाली आहे. कारण सैराट हा चित्रपट कन्नड भाषेत येणार आहे. ही गोष्ट सर्वांनाच माहित होती. पण या कन्नड चित्रपटात आर्ची असणार आहे की नाही याविषयी निश्चित होत नव्हते. कारण रिंकू यावर्षी दहावीत असल्यामुळे चित्रपटात काम करायला तयार होईल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. पण आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली आहे. अखेर कन्नड भाषेतील सैराट चित्रपटात आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूच असणार आहे. हे आता निश्चित झाले आहे. नुकतेच कन्नड भाषेतील सैराट चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. या चित्रपटातील चित्रिकरणाचे काही सीन सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले आहे. या सीन्समध्ये  रिंकू पाहायला मिळते आहे. हे चित्रिकरण ज्यावेळी परश्या आर्चीला फ्लॅट दाखवायला नेतो त्यावेळचे असल्याचे समजत आहे. तसेच या चित्रपटात आर्चीच्या भूमिकेसाठी १५० मुलींचे ऑडिशन घेण्यात आले. मात्र आर्चीच्या भूमिकेला टक्कर देणारी कोणी मिळाली नाही. त्यामुळे या चित्रपटात रिंकूची वर्णी लागली असल्याचे कळते. कन्नड भाषेतील सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शक ए. नारायण हे आहेत. मराठीनंतर हा चित्रपट प्रथमच कन्नड भाषेतील रिमेक असणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात रिंकूसोबत दाक्षिणात्य खलनायक सत्यप्रकाश यांचा मुलगा सी.बी. राजदेखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे रिंकूच्या चाहत्यांना हे अनोखे दिवाळी सरप्राईज मिळाले आहे हे मात्र नक्की. 

Web Title: Why Archie again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.