​स्वप्निल पडला कोणाच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 11:22 IST2016-10-25T10:41:26+5:302016-10-25T11:22:44+5:30

स्वप्निल जोशी कोणाच्या प्रेमात पडला आहे असे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का? हो, पण हे खरे आहे. ...

In whose love did the dream fall? | ​स्वप्निल पडला कोणाच्या प्रेमात?

​स्वप्निल पडला कोणाच्या प्रेमात?

वप्निल जोशी कोणाच्या प्रेमात पडला आहे असे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का? हो, पण हे खरे आहे. स्वप्निल कोणाच्यातरी प्रेमात पडला आहे. त्याचे त्याची पत्नी लीना आणि मुलगी मायरा याच्यावर खूप प्रेम आहे. पण असे असूनही स्वप्निल आणखी कशाच्यातरी प्रेमात पडला आहे. स्वप्निल चहाच्या प्रेमात पडला आहे. त्याला चहा प्यायला खूप आवडतो. त्याला चहाचे व्यसनच आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण त्याला चहाचे व्यसन असल्याचे त्याने स्वतःच फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर मान्य केले आहे. तो चहाप्रेमी असल्याने नुकताच माटुंग्याच्या एका हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला होता. तेथील चहा अतिशय टेस्टी असल्याचेदेखील त्याने त्याच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
स्वप्निल सध्या फुगे या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात सुबोध भावे त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे. सुबोध आणि स्वप्निल यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे. एक कलाकार म्हणूनही त्या दोघांना एकमेकांचा अभिनय खूप आवडतो. त्यामुळे त्या दोघांनाही एकत्र काम करण्याची इच्छा होती. खरे तर ते दोघे एक चित्रपटही करणार होते. पण काही कारणास्तव हा चित्रपट होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी एकदा व्यायाम करत असताना आपण आता एकत्र चित्रपट करूयाच असे ठरवले आणि त्या दोघांनी फुगे या चित्रपटाची कथा लिहिली. त्यामुळे या दोघांसाठीदेखील हा चित्रपट खूप खास आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमधून थोडा वेळ काढून स्वप्निलने माटुंग्यातील हॉटेलमध्ये जाऊन चहाचा आस्वाद घेतला. 

Web Title: In whose love did the dream fall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.