अमृताने कोणासोबत वाढदिवस साजरा केला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 16:15 IST2016-11-23T16:15:39+5:302016-11-23T16:15:39+5:30
प्रत्येकासाठी आपला वाढदिवस हा खूप खास असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपला वाढदिवस साजरा करण्यास उत्सुक असतात. त्याचप्रमाणे कलाकारांचे वाढदिवसदेखील चाहत्यांसाठी ...
.jpg)
अमृताने कोणासोबत वाढदिवस साजरा केला?
प रत्येकासाठी आपला वाढदिवस हा खूप खास असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपला वाढदिवस साजरा करण्यास उत्सुक असतात. त्याचप्रमाणे कलाकारांचे वाढदिवसदेखील चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. कारण प्रेक्षकांचे हे लाडके कलाकारदेखील वाढदिवस कशा पध्दतीने साजरा करतात याचीदेखील उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना असते. तर काही चाहतेच आपल्या आवडत्या कलाकारांचा वाढदिवस साजरा करत असल्याचे पाहायला मिळते. आता हेच पाहा ना, आज अमृता खानविलकरचा वाढदिवस आहे. तिचा हा वाढदिवस तिच्या चाहत्यांनी एकदम अनोख्या पध्दतीने साजरा केला आहे. तिचा हा अनोखा वाढदिवस तिच्या फॅन्स क्लबने साजरा केला आहे. तिचा वाढदिवस हा स्पेशल व्हावा या हेतूने तिच्या फॅनक्लबने गोरेगाव येथील Þडिझायर सोसायटीमधील अनाथ मुलांची काळजी घेणाºया सामाजिक संस्थेला भेट दिली. तसेच यावेळी अमृतादेखील उपस्थित होती. तिने आपला काहीसा वेळ येथील अनाथ मुलांसोबत घालविला. तिच्या या सुंदर क्षणी अमृता खूप आनंदी दिसत होती. तसेच तिच्या आनंदाला चार चाँद लावण्यासाठी येथील सामाजिक संस्थेतील अनाथ मुलांनी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही कला तिच्यासमोर सादर केल्या आहेत. या कलेचा आनंद घेत या मुलांनी अमृताला जणू काहीसे रिटर्न गिफ्ट दिले आहेत. तसेच अमृतानेदेखील या मुलांना आकर्षक भेटवस्तू दिल्या आहेत. त्याचबरोबर तिने या मुलांसोबत केकदेखील कापला आहे. तिच्या या वाढदिवसाला मुलांसोबत अमृताने खूपच धमाल केलेली दिसत आहे. तसेच तिच्यासाठी हा वाढदिवस अविस्मरणीय ठरणार आहे हे मात्र नक्की. अमृताने यापूर्वी नटरंग, बाजी, वेलकम जिंदगी, कटयार काळजात घुसली, वन वे तिकीट असे अनेक चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहेत. त्याचबरोबर ती हिंदी रियालीटी शोमध्येदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तसेच तिने वाजले की बारा या गाण्याने प्रेक्षकांचे मनावर आधिराज्यदेखील गाजविले आहे.
![]()
![]()