कोण आहे सिध्दार्थ जाधवचा छोटा सुपरहिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 14:08 IST2016-12-20T14:08:54+5:302016-12-20T14:08:54+5:30
प्रत्येक व्यक्तीसाठी आपण केलेल्या कामाचे कौतुक झाले तर त्या व्यक्तीला खूपच आनंद होत असतो. त्याला त्याच्या केलेल्या कामाची पावती ...
.jpg)
कोण आहे सिध्दार्थ जाधवचा छोटा सुपरहिरो
प रत्येक व्यक्तीसाठी आपण केलेल्या कामाचे कौतुक झाले तर त्या व्यक्तीला खूपच आनंद होत असतो. त्याला त्याच्या केलेल्या कामाची पावती मिळाली असे वाटते. तसेच त्या व्यक्तीला पुढील कामासाठी प्रोत्साहनदेखील मिळत असते. असेच कौतुक प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिध्दार्थ जाधव याचे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या कामाचे हे कौतुक कोणी मोठया माणसाने केले नसून, त्याच्या एका लहान चाहत्याने केले आहे. त्याने सिध्दार्थचे हे कौतुक गेला उडत या नाटकासाठी केले आहे. त्यामुळे सिध्दार्थ खूपच आनंदी झाला असल्याचे दिसत आहे. कारण नुकतेच सिध्दार्थने आपल्या या लहान चाहत्यासोबतचा एक व्हिडोओ सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर त्याने एक पोस्टदेखील शेअर केली आहे. सिध्दार्थ आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतो, गेला उडत या नाटकाच्या प्रयोगावेळी काल मला एक छोटा सुपरहिरो भेटला. त्याचं नाव लिखित गौरव सावंत असे आहे. त्याचे वय केवळ तीन वर्ष आहे. त्याला हे नाटक प्रचंड तर आवडलय पण तो स्व:ता एक प्रचंड एनर्जी असलेला छोटा सुपरहिरो असल्याचेदेखील त्याने आपल्या पोस्टमधून सांगितले आहे. काल आम्ही दोघांनीही खूप कल्ला केला आहे. त्याच्या या व्हिडीओला सोशलमीडियावर प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओलादेखील खूप कमेंन्टसदेखील मिळाले असल्याचे पाहायला मिळत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित गेला उडत हे नाटक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तसेच या नाटकाचे प्रमोशन अदयाप ही जोरात चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. या नाटकाची चर्चादेखील तितकीच रंगत आहे. सिध्दार्थ जाधव याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे. तसेच त्याने जत्रा, टाइमप्लीज, प्रियतमा, खोखो, कुटूंब असे अनेक चित्रपट केले आहेत.