जेव्हा कोणी म्हणतं नाकातून रक्त काढून दाखव तेव्हा..., स्वप्नील जोशी म्हणतो- "दुनियादारीला १० वर्ष होऊनही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:21 IST2025-05-27T11:21:01+5:302025-05-27T11:21:26+5:30
Swapnil Joshi on Duniyadari Movie : २०१३ साली 'दुनियादारी' चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळला होता. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. दरम्यान नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्याने 'दुनियादारी' सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जेव्हा कोणी म्हणतं नाकातून रक्त काढून दाखव तेव्हा..., स्वप्नील जोशी म्हणतो- "दुनियादारीला १० वर्ष होऊनही..."
२०१३ साली 'दुनियादारी' चित्रपट (Duniyadari Movie) प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळला होता. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित 'दुनियादारी' या सिनेमात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे या कलाकारांनी काम केले आहे. चित्रपटात श्रेयसची भूमिका अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)ने साकारली आहे. दरम्यान नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्याने 'दुनियादारी' सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
स्वप्नील जोशीने नुकतेच ऑडपॉडला मुलाखत दिली. यावेळी त्याने दुनियादारी सिनेमावर भाष्य केले. तो म्हणाला की, मला असं वाटतं की कुठली पोस्ट नाही की त्याच्या खाली अशी कमेंट येत नाही. मला परत खूप भारी वाटतं. दुनियादारी सिनेमाला १० वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. आणि २ मिनिट्सचा जमाना आहे. नूडल्सला दोन मिनिटं लागतात. इथे जर १५ वर्ष जुनी एक आठवण काल परवा इतकी ताजी होत असेल तर त्या चित्रपटाने किती मोठा इम्पॅक्ट केला असेल तरूणाईवर. जेव्हा जेव्हा मला कोणतरी म्हणतं की नाकातून रक्त काढून दाखव तेव्हा तेव्हा मला आठवतं दुनियादारी किती मोठा हिट होता आणि त्यांना जर दुनियादारीतला श्रेयस आठवत असेल जिथे कालचं आठवत नाही रे आपल्याला. तर त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. त्या सगळ्यांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं.
वर्कफ्रंट
अभिनेता स्वप्नील जोशी नुकताच सुशीला सुजीत सिनेमात झळकला. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होती. याशिवाय तो चिकी चिकी बुबूम बूम या सिनेमातही तो पाहायला मिळाला होता. यात त्याच्यासोबत महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार पाहायला मिळाले होते.