तुमची लाडकी गौरी सध्या काय करते, लवकरच सायली संजीव झळकणार रुपेरी पडद्यावर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 15:12 IST2018-02-02T09:42:21+5:302018-02-02T15:12:21+5:30
छोट्या पडद्यावरील काहे दिया परदेस ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती.बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या ...
.jpg)
तुमची लाडकी गौरी सध्या काय करते, लवकरच सायली संजीव झळकणार रुपेरी पडद्यावर !
छ ट्या पडद्यावरील काहे दिया परदेस ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती.बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.त्यामुळे मालिकेने निरोप घेतल्यानंतरही हे दोन्ही लाडके कलाकार विशेषतः सायली काय करते हे जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे. ती काय करते, तिचा आगामी प्रोजेक्ट काय, सायली सिनेमा करणार की छोट्या पडद्यावर ती परतणार याची रसिकांना उत्सुकता आहे. सायलीच्या फॅन्ससाठी एक गुडन्यूज आहे.कारण सायली लवकरच मराठी सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारत आहे.
या सिनेमाचे नाव मात्र सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या सिनेमाचे शूटिंग नुकतंच लंडनमध्ये करण्यात आले आहे.या सिनेमात सायलीसह मराठीतील यंग जनरेशन झळकणार आहे.'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील अभिनेता सुव्रत जोशी,अभिनेत्री मृणमयी देशपांडे, अंजली पाटील या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका असतील. याशिवाय हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता अंकित मोहन या सिनेमातून मराठीत एंट्री करत आहे.त्यामुळे ऋषी सक्सेनाप्रमाणे अंकित मोहन सायलीसाठी लकी ठरतो का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या सिनेमात सायली ग्लॅमरस भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा आहे.तिचे ग्लॅमरस अंदाजातले फोटो सध्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहे.या फोटोंमधील सायलीचा ग्लॅमरस अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.लंडनच्या शूटिंगदरम्यानची धम्माल मस्तीसुद्धा सायलीने लंडन डायरी या हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर केली आहे.सहकलाकार सुव्रत,मृणमयी आणि अंजली यांनीसुद्धा या लंडनवारीतील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोतून अभिनेता सुव्रतने सायलीची खोड काढण्याची संधी सोडली नाही.सायलीला कानात कापूस घालण्याची सवय आहे. हाच धागा पकडून सुव्रतने सायलीचा एक सेल्फी शेअर केला आहे.या सेल्फीवर त्याने एक मजेशीर कमेंटसुद्धा केली आहे.फोटो काढण्याआधी कानातील कापूस काढला आहे का असा गंमतीशीर प्रश्न त्याने हा सेल्फी पोस्ट करताना विचारला आहे.त्यामुळे लंडनमध्ये सिनेमाच्या शूटिंगमध्ये धम्माल मस्ती करणारी ही टीम सोशल मीडियावर रसिकांची मने जिंकत आहे.आता त्यांचा सिनेमासुद्धा रसिकांना भावेल अशी आशा करायला हरकत नाही.