काय आहे उर्मिलाची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 17:23 IST2016-12-05T17:23:39+5:302016-12-05T17:23:39+5:30
उर्मिला कोठारे आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिदधा अभिनेत्री आहे. चित्रपट आणि मालिकांमधून उर्मिलाने तिचे अभिनय कौशल्य वेळोवेळी दाखवूनच दिले आहे. ...

काय आहे उर्मिलाची खंत
उ ्मिला कोठारे आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिदधा अभिनेत्री आहे. चित्रपट आणि मालिकांमधून उर्मिलाने तिचे अभिनय कौशल्य वेळोवेळी दाखवूनच दिले आहे. नुकतीच उर्मिला आपल्याला छोट्या पडदयावरील एका मालिकेमध्ये अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारताना दिसली होती. परंतू सध्या उर्मिला एक खंत व्यक्त करीत आहे. तुम्हाला माहितीय का उर्मिलाची खंत काय आहे. मराठमोळी अभिनेत्री उर्मिलाला असे वाटते की आपल्याकडे शाळेमध्ये मुलांना इतिहास हा विषय योग्य प्रकारे शिकवली जात नाही. किंवा बºयाच मुलांसा भारताच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती नसल्याची खंत नुकतीच उर्मिलाने एका कार्यक्रमा प्रसंगी बोलुन दाखवली. उर्मिला सांगते, महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या आहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित मालिकेत काम करताना इतिहासातील खलिते, पत्रांचा अभ्यास करण्यास मिळाला. हा एक चांगला अनुभव होता. मात्र, आजच्या पिढीला भारताच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती नसते. काही इंग्रजी शाळांतही हा विषय चांगल्या प्रकारे शिकवला जात नाही, अशी खंत अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर-कोठारे हिने व्यक्त केली. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास खूप मोठा आहे. तो आजच्या पिढीला माहीत असावा, मुलांनीदेखील आपापल्या पद्धतीने इतिहास समजवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असेही उर्मिलाने यावेळी सांगितले. आता उर्मिलाला जरी वाटले कि मुलांनी इतिहास शिकावा तरी मुलांना या विषयी गोडी निर्माण होणे जास्त आवश्यक आहे हे तितकेच खरे. असो आता उर्मिलाचा हा सल्ला किती विदयार्थि मनावर घेतात आणि इतिहासात रुची दाखवतात हे काही सांगता येणार नाही.