नम्रता गायकवाडच्या ‘बेधडक’चं काय आहे राज ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 11:11 IST2017-08-23T05:41:09+5:302017-08-23T11:11:09+5:30
छोटा पडदा, रंगभूमी आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता गायकवाड. मराठीसह ...
.jpg)
नम्रता गायकवाडच्या ‘बेधडक’चं काय आहे राज ?
छ टा पडदा, रंगभूमी आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता गायकवाड. मराठीसह दाक्षिणात्य सिनेमाचीही तिला ऑफर मिळाली. आपला अभिनय, घायाळ करणा-या अदा आणि सौंदर्यानं नम्रतानं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. आजवर विविधरंगी भूमिका साकारुन तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. लवकरच नम्रता वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. तिचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. नम्रताच्या या आगामी सिनेमाचं नाव बेधडक असं असेल. खुद्द नम्रताने या नव्या सिनेमाची गुड न्यूज तिच्या फॅन्ससह शेअर केली आहे. त्यामुळे या सिनेमाविषयी रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यांत नम्रताचा अनोखा अंदाज रसिकांना पाहायला मिळणार असल्याची चिन्हं आहेत. सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणेच या सिनेमाची कथाही तितकीच बेधडक अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. तसंच सिनेमाच्या शीर्षकावरुन नम्रताची भूमिकाही तितकीच बेधडक असणार असं सध्या कानावर पडत आहे. याआधी नम्रताने विविध माध्यमांमधून रसिकांची मनं जिंकली आहे. कॅम्पस कट्टा, वंशवेल, सौभाग्य माझं दैवत, विजय असो, लंगर- एक पाश, स्वराज्य – मराठी पाऊल पडते पुढे अशा विविध सिनेमांमधून विविध प्रकारच्या भूमिका साकारुन नम्रताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय मंगळसूत्र या मालिकेतही तिने भूमिका साकारली आहे. मालिका आणि मराठी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या नम्रताने रंगभूमीवरही आपल्या अभिनयानं नाट्य रसिकांची मनं जिंकली आहेत. मी कुमारी अरुणा, ज्ञानोबा माझा यासारख्या नाटकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती विविध नवीन प्रोजेक्ट्सवरही काम करत आहे. दाक्षिणात्य सिनेमांच्या ऑफर्सही तिच्याकडे आहेत. त्यातच आता 'बेधडक' या सिनेमाची घोषणा समोर आली आहे. त्यामुळे नम्रता आगामी काळात बरीच बिझी असून तिच्या फॅन्सना लवकरच तिच्या अभिनयाची जादू रुपेरी पडद्यावर अनुभवण्यास मिळणार आहे.