प्रियावर कोणत्या प्रश्नांचा झाला भडीमार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 14:21 IST2016-10-27T14:21:09+5:302016-10-27T14:21:09+5:30
अभिनेत्री प्रिया बापट आपल्याला नेहमीच विविध भूमिकांमधून पाहायला मिळते. आगामी वजनदार या चित्रपटात ...

प्रियावर कोणत्या प्रश्नांचा झाला भडीमार ?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
अभिनेत्री प्रिया बापट आपल्याला नेहमीच विविध भूमिकांमधून पाहायला मिळते. आगामी वजनदार या चित्रपटात देखील प्रिया एकदमच हटके अंदाजात प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रियाने उमेश कामतसोबत संसार थाटल्यानंतरही अनेक दर्जेदार चित्रपट प्रियाने काम केले. बऱ्याचदा अभिनेत्री लग्नानंतर घर, मुले यांच्यात व्यस्त होताना दिसतात. मग त्या फारशा चित्रपटात झळकत नाहीत. परंतु प्रियाने संसार आणि करिअर यांचे संतुलन चांगले राखले. काही दिवसांपूर्वी प्रियावर एकाच प्रश्नांचा भडीमार करण्यात आला होतो. तो प्रश्न होता की, प्रियाकडे खरेच आनंदाची बातमी आहे का? तिच्या घरी नवा पाहुणा येणार का? या प्रश्नांच्या भडिमारामुळे प्रिया चांगलीच वैतागली होती. आता तुम्ही म्हणाल कि, प्रियाला असा प्रश्न का बरं विचारण्यात आला. तर त्याचे झाले असे कि, वजनदार या चित्रपटासाठी प्रियाने चांगलेच वजन वाढवले होते. प्रिया या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी चांगलीच वजनदार झाली होती. या वाढलेल्या वजनामुळे प्रियाकडे बघून सगळ्यांचा तिच्याकडे आनंदाची बातमी आहे असे वाटायचे. काहीजणांनी तर प्रियाला घरी फोन करून गुड न्युजसाठी शुभेच्छा ही दिल्या. तर एका कार्यक्रमाच्या प्रसंगी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी प्रियाला वाढलेल्या वजनामध्ये पाहिले. त्यावेळी त्या तिला एकदम हसत हसत म्हणाल्या, अगं तु एखाद्या गरोदर बाई सारखी दिसते आहेस. त्यावेळी प्रियाला हसुच आवरता आले नाही. वजनदार या चित्रपटासाठी प्रियाने तब्बल १६ किलो वजन वाढविले होते. त्यामुळे या चित्रपटात आपल्याला एकदमच गोलु पोलु प्रिया दिसणार आहे.