​तेजश्री प्रधानने मुक्ता बर्वेला काय विचारले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 09:54 AM2017-06-30T09:54:35+5:302017-06-30T15:24:35+5:30

तेजश्री प्रधानने झेंडा या चित्रपटात तर अनेक मराठी मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी होणार ...

What did Tejashri Pradhan ask Mukta Barve? | ​तेजश्री प्रधानने मुक्ता बर्वेला काय विचारले?

​तेजश्री प्रधानने मुक्ता बर्वेला काय विचारले?

googlenewsNext
जश्री प्रधानने झेंडा या चित्रपटात तर अनेक मराठी मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी होणार सून मी या घरची या मालिकेने दिली. या मालिकेतील तिने साकारलेली जान्हवी ही भूमिका खूपच गाजली होती. आज ही मालिका संपून अनेक महिने झाले असले तरी प्रेक्षक आजही तिला जान्हवी याच नावाने ओळखतात. तर मुक्ता बर्वेने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अग्निहोत्र या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तिची भूमिका खूपच गाजली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-मुंबई, जोगवा यांसारख्या चित्रपटात तिने अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या. तेजश्री आणि मुक्ता यांनी अल्पावधितच मराठी इंडस्ट्रीत आपली जागा बनवली आहे. 
लग्न पहावे करून या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि तेजश्री प्रधान यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाला समीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील सगळ्यांच्याच अभिनयाचे कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी तेजश्री आणि मुक्ता यांची छान गट्टी जमली होती. त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना नुकताच उजाळा दिला आहे.
तेजश्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर तिचा आणि मुक्ताचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि हा फोटो माझ्या खूप जवळचा असल्याचा तिने म्हटले आहे आणि मुक्ताला यावर तुला हा फोटो आठवतोय का असे देखील विचारले आहे. 
तेजश्रीने पोस्ट केलेल्या या फोटोला अनेक लाइक्स मिळत असून अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोत तेजश्री आणि मुक्ता या दोघी आपल्याला भारतीय वेशात पाहायला मिळत आहेत. 

Also Read : ​तेजश्री प्रधानचे पहिले प्रेम तुम्हाला माहीत आहे का?

Web Title: What did Tejashri Pradhan ask Mukta Barve?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.