प्राजक्ताने का घेतला हा निर्णय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 14:08 IST2016-10-29T14:08:37+5:302016-10-29T14:08:37+5:30

मराठी इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचतात. तसेच छोटया पडदयामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्यादेखील मोठया प्रमाणात वाढत असते. पण ...

What is the decision taken by God? | प्राजक्ताने का घेतला हा निर्णय ?

प्राजक्ताने का घेतला हा निर्णय ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">मराठी इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचतात. तसेच छोटया पडदयामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्यादेखील मोठया प्रमाणात वाढत असते. पण तरी ही मालिकेनंतर या हीट झालेल्या काही अभिनेत्री पुन्हा छोटया पडदयावर पाहायला मिळत नाही. असेच काहीसे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबद्दल घडणार असल्याचे समजत आहे. कारण तिने यापुढे मालिका करणार नसल्याचे ठरविले आहे असे कळते आहे. जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या मालिकेतील तिची आणि अभिनेता ललित प्रभाकरची जोडी छोटया पडदयावर हिट ठरली होती. सध्या प्राजक्ताजवळ मराठी चित्रपट आणि नाटक असल्यामुळे तिला पुन्हा मालिकांमध्ये अडकायचे नसल्याचे देखील समजते आहे. तसेच तिने सध्या चित्रपट आणि नाटकवरच फोकस करण्याचे ठरविले असल्याचे समजत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची कभी खुशी कभी गम अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राजक्ताने यापूर्वी देखील प्राजक्ता सुवासिनी, बंध रेशमाचे, सुगरण, गाणे तुमचे आमचे अशा अनेक मालिकेतून पाहायला मिळाली. तसेच तिने खो-खो, संघर्ष, गोळाबेरीज असे चित्रपटदेखील केले आहे. तसेच तिचे प्रेझेंट सरप्राईज हे नाटक देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. सध्या प्राजक्ता पाइपलाइन या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुव्रत जोशी झळकणार आहे. तसेच ती वारसदार या चित्रपटात एका गाण्यावर आपली पाउले थिरकणार आहे. या चित्रपटात ती गणेशवंदना या गाण्यावर नृत्य करणार आहे. तिच्या या गाण्याची कोरिओग्राफी बॉलिवुडचे तगडे कोरिओग्राफर गणेश आचार्या यांनी केली आहे. त्यामुळे प्राजक्ताची गाडी सुसाट निघाल्याची दिसत आहे. 

Web Title: What is the decision taken by God?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.