'काय झाडी.. काय डोंगुर.. काय हाटील.. एकदम ओके', सई ताम्हणकरच्या दौलतरावांसोबतच्या फोटोवर भन्नाट कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 16:18 IST2022-07-04T16:18:03+5:302022-07-04T16:18:21+5:30
अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या खासगी लाइफमुळे चर्चेत आहे.

'काय झाडी.. काय डोंगुर.. काय हाटील.. एकदम ओके', सई ताम्हणकरच्या दौलतरावांसोबतच्या फोटोवर भन्नाट कमेंट्स
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या खासगी लाइफमुळे चर्चेत आहे. सईने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिच्या लाइफ पार्टनरबद्दल सांगितले होते. हा पार्टनर म्हणजे अनिश जोग. नुकताच अनिश जोगचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. निसर्गरम्य ठिकाणावरील दोघांच्या व्हेकेशनमधला हा फोटो आहे. तिच्या या पोस्टवर चाहते भन्नाट कमेंट्स करत आहेत.
सई ताम्हणकरने पोस्ट केलेल्या अनिशसोबतच्या फोटोंवर रसिका सुनील, मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, क्षितिज पटवर्धन, स्वप्निल जोशी या कलाकारांनी कमेंट करत हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. तर चाहत्यांनीसुद्धा सईच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर गाजत असलेला डायलॉग एका नेटकऱ्याने कमेंट्स बॉक्समध्ये पोस्ट केला आहे. काय झाडी.. काय डोंगुर.. काय हाटील.. एकदम ओके.. अशी कमेंट एकाने केली आहे. सईने काही दिवसांपूर्वी अनिशचा फोटो शेअर करत ‘साहेब, दौलतराव, सापडला’ असे हॅशटॅग वापरले होते. मात्र अद्याप त्या दोघांनी नात्याबद्दल जाहीर खुलासा केलेला नाही.
कोण आहे अनिश जोग?
अनिश हा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. त्याने बऱ्याच मराठी चित्रपटांची निर्मिती केली. टाईमप्लीज, व्हायझेड, मुरांबा, गर्लफ्रेंड, धुरळा या चित्रपटांची निर्मिती त्याने केली आहे.