अमेय पुन्हा करणार वेबसीरीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 10:37 IST2016-10-27T13:42:42+5:302016-11-01T10:37:03+5:30
सध्या वेबसीरीजचा जमाना चालू आहे. एकापाठोपाठ एक वेबसीरीज मराठी इंडस्ट्रीमध्ये येवू पाहात आहे. कास्टिंग काऊच, स्ट्रगलर साला, बॅक बेंचर्स ...

अमेय पुन्हा करणार वेबसीरीज
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सध्या वेबसीरीजचा जमाना चालू आहे. एकापाठोपाठ एक वेबसीरीज मराठी इंडस्ट्रीमध्ये येवू पाहात आहे. कास्टिंग काऊच, स्ट्रगलर साला, बॅक बेंचर्स अशा अनेक वेबसीरीज पाठोपाठ आता, अमेयची आणखी एक वेबसीरीज येणार असल्याचे समजत आहे. कास्टिंग काऊचनंतर अमेय पुन्हा एकदा हिंग्लीश वेबसीरीजमध्ये झळकणार असल्याचे कळत आहे. ही वेबसीरीज हिंदी - इंग्लिश अशा भाषेचे मिश्रण आहे. मात्र या वेबसीरीजमध्ये त्याच्यासोबत कोण झळकणार आहे. हे अदयापदेखील समजले नाही. तसेच ही वेबसीरीज कशा प्रकारची असणार हे देखील अजून गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर ही वेबसीरीज कधी चालू होणार याबदलची माहिती देखील अजून मिळाली नाही. अमेयची ही दुसरी वेबसीरीज असणार आहे. त्याच्या पहिल्या वेबसीरजमध्ये तो निपुण धर्माधिकारीसोबत पाहायला मिळाला होता. या वेबसीरीजमध्ये अमेय आणि निपुण मराठी इंडस्ट्रीच्या प्रत्येक कलाकाराची फिरकी घेताना पाहायला मिळाले होते. तसेच या वेबसीरीजने कलाकारांची आणि प्रेक्षकांची मनेदेखील जिंकली होती. यापूर्वी अमेयच्या दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेच्या माध्यमातून अमेय घराघरात पोहोचला आहे. तसेच त्याचा नुकताच घंटा हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. आता तो महेश मांजरेकर यांच्या चित्रपटातूनदेखील दिसणार आहे. तसेच त्याचे अमर फोटो स्टुडिओ हे नाटकदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे तो सध्या मालिका, नाटक, वेबसीरीज आणि चित्रपटामंध्ये तो व्यग्र आहे. हे सर्व पाहता सध्या अमेयची गाडी सुसाट निघाल्याचे दिसत आहे.