/>अभिनयासोबतच तेजस्विनी पंडित या गुणी अभिनेत्रीला डिझाईनिंगचीही आवड आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. तेजस्विनीचा ‘Tejadny’ हा ब्रॅण्ड त्याचमुळे अगदी कमी वेळात लोकप्रीय झाला. तेजस्विनीचा आणखी एक पैलूही आहे. जो अद्याप कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तो म्हणजे तिला स्केचिंग आणि पेन्टिंगचीही हौस आहे. तेजस्विनीने तिच्या काही पेन्टिंग आणि स्केचेस सोशल मीडियावर शेअर करीत आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. मी स्केचिंग आणि पेन्टिंगचे कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. हा माझा केवळ छंद आहे. लहानपणापासून मला चित्र काढायला आवडतात. चित्रकार नेहमी त्यांच्या कल्पनेतील चित्रे रेखाटतात, असे मी ऐकले आहे. एक अभिनेत्री या नात्याने मी चित्रपटाशी संबंधित काही चित्रे काढली आहेत. माझी बहुतांश चित्रे फिल्मी आहेत. मोकळा वेळ मिळाला की मी मनसोक्त रंगांशी खेळते, असे तेजूने म्हटले आहे. तेव्हा बघूयात, तेजूची काही चित्रे...