"परदेशातही मोदीजी एक विकासपुरुष; मिहिर कोटेजांना मतदान करा", मराठी अभिनेत्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 07:30 PM2024-05-17T19:30:16+5:302024-05-17T19:30:16+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना मराठी अभिनेत्याने सर्वांना भाजपाला मत देण्याचं आवाहन केलंय (pm narendra modi, devendra fadnavis)

vote for pm narendra modi and mihir kotecha marathi actor abhijit kelkar appeal to people | "परदेशातही मोदीजी एक विकासपुरुष; मिहिर कोटेजांना मतदान करा", मराठी अभिनेत्याचे आवाहन

"परदेशातही मोदीजी एक विकासपुरुष; मिहिर कोटेजांना मतदान करा", मराठी अभिनेत्याचे आवाहन

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. या निवडणुकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार प्रचार सुरु आहे. अनेक कलाकार यंदा भाजपासाठी प्रचार करत आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही प्रचार जोरात सुरु आहे. अशातच मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकरने मुलुंडमध्ये उभे राहिलेले भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेजा यांच्यासाठी मतदानाचे आवाहन केलंय.

अभिजीत केळकरने भाजपाच्या महिला कार्यकर्त्यासोबत एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तो म्हणाला, "भारतीय जनता पक्षाचा सांस्कृतिक विभागात आहे. या गोष्टीचा मला अभिमान आहे. मी लहानपणापासून RSS चा माणूस असून RSS ची शाखाही लावली आहे. आज भारतीय जनता पक्षाचा अविभाज्य भाग आहे, याचा मला अभिमान आहे. मुलुंड मधून मिहिर कोटेजाजी उमेदवार म्हणून उभे आहेत."

अभिजीत पुढे म्हणाला, "गेली साडेचार वर्ष मिहिर कोटेजा हे आमदार होते. आणि आमदार असतानाही त्यांनी खूप चांगलं काम केलंय. मोदीजींनी केवळ भारतात नाही तर परदेशातही एक विकासपुरुष म्हणून मोदीजींकडे बघितलं जातं. त्या मोदींचे हात बळकट करण्यासाठी मिहिर कोटेजांनी निवडून येण आवश्यक आहे. आम्ही भाजपाचे कार्यक्रते त्यांना निवडून देण्यासाठी सक्रिय आहोतच."

Web Title: vote for pm narendra modi and mihir kotecha marathi actor abhijit kelkar appeal to people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.