​आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात 'मोरया -तुझ्या नामाचा गजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 15:16 IST2017-07-03T09:46:55+5:302017-07-03T15:16:55+5:30

सप्तसूर म्युझिक कंपनी निर्मित आणि मेघा घाडगे अभिनित "काटाकिर्रर्र" हे गाणे आपल्या चांगल्याच परिचयाचे आहे. आदर्श शिंदे यांच्या आवाजातील ...

In the voice of Adarsh ​​Shinde and Jodi Joshi, 'Morya -You namaacha alarm' | ​आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात 'मोरया -तुझ्या नामाचा गजर'

​आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात 'मोरया -तुझ्या नामाचा गजर'

्तसूर म्युझिक कंपनी निर्मित आणि मेघा घाडगे अभिनित "काटाकिर्रर्र" हे गाणे आपल्या चांगल्याच परिचयाचे आहे. आदर्श शिंदे यांच्या आवाजातील या गाण्याने गेल्या काही महिन्यातच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक मराठी सिनेमांमधून आपण आदर्श शिंदे यांच्या आवाजाची जादू अनुभवली आहे. 'दुनियादारी' या सिनेमातील "देवा तुझ्या गाभाऱ्याला" गाणे असो किंवा 'दगडी चाळ' मधील "मोरया" हे गाणे त्याच्या आवाजाने गाण्याला एक वेगळा साज येतो. "काटाकिर्रर्र" या गाण्याची निर्मिती सप्तसूर म्युझिक कंपनीचे मंगेश मोरे यांनी केली असून आशिष मोरे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले होते. "कुलदैवत महाराष्ट्राचे" हा सप्तसूर म्युझिक कंपनीचा पहिला वाहिला म्युझिक अल्बम असून यात १५ भक्तीपर गीते सादर करण्यात आली आहेत. खंडोबाचा मंत्र या म्युझिक कंपनीने पहिल्यांदा लोकांसमोर आणला आहे. यानंतर निर्मिती करण्यात आली ती "काटाकिर्रर" या म्युझिक सिंगलची.   
काटाकिर्ररची हीच टीम आपल्यासाठी गणपतीची स्तुती सांगणारे एक गाणे घेऊन येत आहे. गणपती हा आपल्या सगळ्यांचा लाडका असून त्याच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. "मोरया -तुझ्या नामाचा गजर" हे या गाण्याचे नाव असून नुकतेच या गाण्याचे रेकॉर्डिंग एन्झी स्टुडिओ येथे करण्यात आले. "आदी तू अनंत तू तू गणनायका, शिवसुता गिरिजात्मजा तू गणनायका" असे या गाण्याचे बोल असून अमिताभ आर्य यांनी हे बोल लिहिले आहेत.  
आशिष मोरे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे संगीत संयोजन गणेश सातार्डेकर यांनी केले आहे. गणपतीची स्तुती करणाऱ्या गाण्यात आदर्श शिंदे यांच्यासोबत आनंदी जोशी यांचादेखील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. "दुनियादारी", "डबल सीट", "पिंडदान", "नारबाची वाडी" यांसारख्या सिनेमातून आनंदी जोशींचा मंजुळ आवाज आपण ऐकला आहे तर आशिष मोरे यांनी शान, कुणाल गांजावाला, जावेद अली, सुरेश वाडकर, अमृता फडणवीस यांसारख्या दिग्गज गायकांबरोबर काम केले आहे. आशिष मोरे यांचा "एक आमचा बाणा" हे महाराष्ट्राचे गौरवगीत असलेले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गणेशाची स्तुती करणारे आदर्श- आनंदीच्या स्वरातील हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

Web Title: In the voice of Adarsh ​​Shinde and Jodi Joshi, 'Morya -You namaacha alarm'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.