मंगळ ग्रह मंदिराला अलका कुबल यांची भेट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 17:39 IST2017-02-22T12:09:48+5:302017-02-22T17:39:48+5:30
-Ravindra More जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळदेव ग्रह मंदिराला नुकतीच ख्यातनाम सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी भेट ...
(7).jpg)
मंगळ ग्रह मंदिराला अलका कुबल यांची भेट !
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळदेव ग्रह मंदिराला नुकतीच ख्यातनाम सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी भेट दिली.
एका मराठी वाहिनीवरील ‘दर्शन’ मालिकेत श्री मंगळदेव ग्रह मंदिराची माहिती प्रसारीत केली जाणार आहे. त्यासाठी मंदिर व परिसराचे चित्रीकरण करण्यासाठी अलका कुबल व संबंधीत वाहिनीची टीम आली होती. त्यांना पाहण्यासाठी परिसरातील लोक ांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी अलका कुबल यांच्यासोबत फोटो व सेल्फीचा आनंद लुटला. अलका कुबल यांच्यासह टीमने मंदिर व परीसराची मुक्त कंठाने प्रसंशा केली. कुबल यांनी मंदिराचे पुजारी गणेश खरोटे यांच्या समवेत आरतीही केली.
मंदिरातर्फे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाद्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्थ अनिल अहिरराव, सेवेकरी विनोद कदम, सौ.सुनीता कुलकर्णी, सौ.रजनी पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.