विशाखा सुभेदारही रोहित शेट्टीची चाहती, फोटो काढण्यासाठी गेली अन्...; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:30 IST2025-07-01T16:29:53+5:302025-07-01T16:30:42+5:30
राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांच्या उपस्थितीने 'ये रे ये रे पैसा ३'च्या ट्रेलर लाँचला चार चाँद लागले.

विशाखा सुभेदारही रोहित शेट्टीची चाहती, फोटो काढण्यासाठी गेली अन्...; Video व्हायरल
मराठी सिनेमांच्या इतिहासात गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'ये रे ये रे पैसा'. या सिनेमाचा आता तिसरा भाग येत आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा ३' (Ye Re Ye Re Paisa 3) मध्ये सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित आणि संजय नार्वेकर यांची भूमिका आहे. कालच सिनेमाचा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती होती. तसंच त्यांच्यासोबत बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीही (Rohit Shetty) होता. सध्या या ट्रेलर लाँचमधील काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांच्या उपस्थितीने 'ये रे ये रे पैसा ३'च्या ट्रेलर लाँचला चार चाँद लागले. सर्वांनी धमाल केली. राज ठाकरेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये विनोदाची फटकेबाजीही केली. सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट यावेळी तिथे होती. विशाखा सुभेदार, वनिता खरात, आनंद इंगळे, बिजॉय आनंद आणि मीरा जगन्नाथ यांचीही सिनेमात भूमिका आहे. ट्रेलर लाँचवेळी रोहित शेट्टीसोबत फोटो काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. विशाखा सुभेदारचीही (Vishakha Subhedar) त्याच्यासोबत फोटो काढण्याची धडपड सुरु होती. बरीच गर्दी असल्याने रोहित शेट्टीनेच तिला जागा करुन दिली. फोटो काढल्यानंतर दोघांनी काही सेकंद संवादही साधला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
आदित्य, बबली आणि सनीचं ५ कोटी मिळवायचं स्वप्न होणार का पूर्ण? ‘येरे येरे पैसा ३’चा धमाल ट्रेलर रिलीज
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा सिनेमा १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.