​विक्रम फडणीसच्या ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ‘मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 16:12 IST2017-06-30T10:42:42+5:302017-06-30T16:12:42+5:30

विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. १० ते २२ ऑगस्ट ...

Vikram Phadnis will premiere at the 'Hardayant' movie at the Melbourne Film Festival | ​विक्रम फडणीसच्या ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ‘मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर

​विक्रम फडणीसच्या ‘हृदयांतर’ चित्रपटाचा ‘मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर

क्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाची निवड यंदा मेलबर्नमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल (IFFM)साठी झाली आहे. १० ते २२ ऑगस्ट २०१७ दरम्यान मेलबर्नमध्ये आयोजित होणाऱ्या या फिल्म फेस्टिव्हलद्वारे हृदयांतरचा वल्ड प्रीमियर होणार आहे.
बहुप्रतिक्षित चित्रपट हृदयांतरद्वारे विक्रम फडणीस दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. या कौटुंबिक भावनिक चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसतील.
हृदयाला भिडणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता हृतिक रोशनच्या हस्ते झाला होता तर सिनेमाच्या संगीत अनावरण सोहळ्याला सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चन उपस्थित होती.
मेलबर्नला होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विक्रम फडणीस आपला चित्रपट प्रस्तूत करणार आहेत. तसेच आपला फॅशन डिझाइनर ते फिल्ममेकर हा प्रवास ‘कॅटवॉक टू सिनेमा’ या मास्टरक्लासद्वारे चित्रपट रसिकांसमोर मांडतील. या सन्मानाने आनंदित झालेले विक्रम फडणीस प्रतिक्रिया देताना सांगतात, “हृदयांतर चित्रपटाला अशा पद्धतीने एक जागतिक व्यासपीठ मिळणे हा आमचा सन्मानच आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिनेरसिकांसमोर आणि मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझ्या सिनेमाचे सादरीकरण करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्यासारखा एखादा नवोदित फिल्ममेकर यापेक्षा अधिक काय मागू शकेल.”
या भारतीय फिल्म महोत्सवात ‘हृदयांतर’ शिवाय अ बिलियन कलर स्टोरी (इंग्रजी), आसामपता (बंगाली), चोर- द सायकल (आसामी), क्रॉनिकल्स ऑफ हरी (कन्नडा), अ डेथ इन दि गंज (इंग्रजी). डॉ. रखमाबाई (मराठी), पूर्णा- करेज हॅज नो लिमिट्स (हिंदीं) आणि बाहुबली- बाहूबली २ हे चित्रपट दाखवले जातील.
या चित्रपटात  मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे यांच्याशिवाय तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य, अमित खेडेकर आणि मीना नाईक  यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Also Read : ‘हृदयांतर’ चित्रपटात सुबोध भावे वडिलांच्या भूमिकेत...

Web Title: Vikram Phadnis will premiere at the 'Hardayant' movie at the Melbourne Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.