VIDEO : ‘ट्रिब्यूट टू "सैराट" व्हाया राजस्थान....’ एक अनोखी लव्हस्टोरी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 14:10 IST2016-08-05T08:40:43+5:302016-08-05T14:10:43+5:30
‘सैराट’ चित्रपटाचं याड मराठी माणसांच्या पलीकडे जाऊन कन्नडमध्ये या चित्रपटाची गाणी रिमेक करण्याची मजल काही चाहत्यांनी केली आहे.

VIDEO : ‘ट्रिब्यूट टू "सैराट" व्हाया राजस्थान....’ एक अनोखी लव्हस्टोरी !
'याड लागलं' या अजय अतुलच्या गाण्याने सर्वांनाच याड लावलय. या गाण्यावर राजस्थानातील प्रतिभावंत कलाकारांनी एक अतिशय सुंदर व्हिडिओ शूट केला आहे. 'ट्रिब्यूट टू 'सैराट' व्हाया राजस्थान' असे या व्हिडिओचे नाव आहे. 'सैराट'मधील गाण्यावर एक नवी कोरी फिल्मी कथा या व्हिडिओत मांडली आहे. यातील दृष्ये अतिशय सुंदररित्या चित्रीत झाली आहेत.
या व्हिडिओत सौरव जैन, निमिषा भट्टी, हर्षित तोष्णीवाल या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. सिनेमॅटोग्राफी आरजे ट्वेन्टी सेव्हन आणि प्रविण कुमार या दोघांची असून एडिटींग आरजे ट्वेन्टी सेव्हन याने केले आहे. व्हिडिओचे दिग्दर्शन आणि लेखन सौरव जैन याने केले आहे.