VIDEO : मृण्मयी देशपांडेनं गौतमीची केली चांगलीच धुलाई, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 12:33 PM2022-07-07T12:33:53+5:302022-07-07T12:34:18+5:30

Mrunmayee Deshpande And Gautami Deshpande: मृण्मयी देशपांडेनं नुकताच गौतमीसोबतचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत मृण्मयी गौतमीची धुलाई करताना दिसते आहे.

VIDEO: Mrunmayee Deshpande washes Gautami well, video goes viral | VIDEO : मृण्मयी देशपांडेनं गौतमीची केली चांगलीच धुलाई, व्हिडीओ होतोय व्हायरल

VIDEO : मृण्मयी देशपांडेनं गौतमीची केली चांगलीच धुलाई, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

छोटा पडदा गाजवल्यानंतर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे(Mrunmayee Deshpande)ने रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली. तिने सिनेइंडस्ट्रीत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. मृण्मयीच्या पावलांवर पाऊल ठेवत तिची बहिण गौतमी (Gautami Deshpande)नेदेखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. या दोघी बहिणींमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे. त्या दोघी एकमेकींसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान, मृण्मयीने नुकताच गौतमीसोबतचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर  शेअर केला आहे. या व्हिडीओत मृण्मयी गौतमीची धुलाई करताना दिसते आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मृण्मयी सांगताना दिसते आहे की, जेव्हा मला करायला काही नसतं, कंटाळा आलेला असतो तेव्हा सगळ्या मोठ्या भावांनी करून पाहायला हरकत नाही. त्यानंतर ती रोबोटसारखी अॅक्शन करत गौतमीची धुलाई करताना दिसते आहे. ती गौतमीसोबत गंमत करताना या व्हिडीओत दिसते आहे.

हा व्हिडीओ शेअर करून मृण्मयीने कॅप्शनमध्ये लिहिले की, मायबाप प्रेक्षक, आणि समस्त मोठी भावंड यांच्या आग्रहाला मान देऊन, हा व्हिडिओ सर्व मोठ्या भावंडांना समर्पित करत आहे... सध्या पाऊस जोरदार असल्यामुळे घरी जास्त वेळ काढावा लागतो... आपला वेळ आपण असा मार्गी लावू शकतो... आपल्या आयांना बाहेर ठेऊन हे करता आलं तर लहानांना जास्त मारता येईल!! आणि आपल्याला जास्त मजा येईल...

मृण्मयी देशपांडेने अग्निहोत्र या मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा तिने उमटविला आहे. मृण्यमयीने फर्जंद चित्रपटात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. ती एक यशस्वी दिग्दर्शिका सुद्धा आहे. तर गौतमी एक अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिकादेखील आहे. झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

Web Title: VIDEO: Mrunmayee Deshpande washes Gautami well, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.