Video: गॅरीच्या गर्लफ्रेंडचं प्रेक्षकांवर 'माया'जाल; हृतिकच्या गाण्यावर धरला ताल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 14:22 IST2021-10-11T14:21:57+5:302021-10-11T14:22:46+5:30
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली रुचिरा कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Video: गॅरीच्या गर्लफ्रेंडचं प्रेक्षकांवर 'माया'जाल; हृतिकच्या गाण्यावर धरला ताल
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'. अभिनेता अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका सुनील या तिघांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. या तीनही कलाकारांसोबतच मालिकेतील अन्य भूमिकाही गाजल्या. त्यातलीच एक भूमिका म्हणजे माया. अभिनेत्री रुचिरा जाधव हिने मायाची भूमिका साकारली होती. उत्तम अभिनय शैली आणि ग्लॅमरस लूकमुळे रुचिरा चांगलीच चर्चेत आली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली रुचिरा कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अनेकदा रुचिरा तिचे काही व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अत्यंत साध्या लूकमध्ये दिसत असून तिचा हा लूक सुद्धा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
रुचिराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती 'कहो ना प्यार है' या चित्रपटातील 'चांद सितारे, फूल और खुशबू' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने 'बिन गहने और सिंगार बिना…'असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, रुचिका मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर रुचिका प्रचंड लोकप्रिय असून तिचे 465k फॉलोअर्स आहेत. रुचिकाने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेव्यतिरिक्त कलर्स मराठी वाहिनीवरील 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकेत नुपूरची भूमिका साकारली होती. शुद्ध देसी या युट्यूब चॅनलवरील 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' या वेब सीरिजमध्येही तिने काम केलंय.इतकंच नाही तर 'प्रेम हे', 'बे दुणे दहा', 'माझे पती सौभाग्यवती' अशा काही मालिकांमध्येही ती झळकली.