नाट्यगृहांची वाईट अवस्था, अभिनेते वैभव मांगले भडकले, पोस्ट करत म्हणाले; "बालगंधर्वला तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 02:33 PM2023-05-15T14:33:08+5:302023-05-15T14:48:12+5:30

अभिनेते वैभव मांगले हे सध्या संज्या छाया नाटकात काम करत आहेत.

vaibhav mangale marathi actor disappointed on bad situation at theatres | नाट्यगृहांची वाईट अवस्था, अभिनेते वैभव मांगले भडकले, पोस्ट करत म्हणाले; "बालगंधर्वला तर..."

नाट्यगृहांची वाईट अवस्था, अभिनेते वैभव मांगले भडकले, पोस्ट करत म्हणाले; "बालगंधर्वला तर..."

googlenewsNext

मराठी नाटकं लागणं म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच असते. अनेक मराठी नाटकं सध्या रंगमंच गाजवत आहेत. मात्र नाटकादरम्यानची एक बोंब अजूनही सुरुच आहे ती म्हणजे नाट्यगृहांची अवस्था. पुणे असो किंवा औरंगाबाद सगळ्याच नाट्यगृहांमध्ये काही नाही काही समस्या आहेत. प्रेक्षकही वैतागले असून कलाकारही हैराण आहेत. नुकतंच अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी फेसबुक पोस्ट करत नाराजी दर्शवली आहे.

अभिनेते वैभव मांगले हे सध्या संज्या छाया नाटकात काम करत आहेत. नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. मात्र नाट्यगृहांच्या वाईट अवस्थेमुळे त्यांना २ प्रयोग रद्द करण्याची वेळी आली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले,"पुणे , औरंगाबाद , नाशिक येथे प्रयोग झाले संज्या छायाचे . एका हि ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती . रंग मंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला . प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात( विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास  आणि उकाडा , कोथरूड यशवंतराव .. उकाडा )  )  प्रयोग पहात होते . एक मर्यादे नंतर नाशिक मध्ये रसिकांचा राग ,हतबलता अनावर झाली त्यांनी गोंधळ केला . तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले . पण आपण show must go ȏṅ वाले लोक . आम्ही विनंती केली की आम्हाला ही त्रास होतोच आहे .. इथे येई पर्यंत माहित नव्हतं कि कि ac नाहीयेय . आमच्या निर्माते दिलीप जाधव यांनी 17 आणि 27 चे शो रद्द केले .त्या हवे चे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला . कालिदास ला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता . या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय . कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी ??? विचारलं तर सांगतात ac चालू आहे पण खूप गर्मी असल्याने ac यंत्रणा नीट काम करत नाही . पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही . काय बोलावं या सगळ्यावर वर .????????

वैभव मांगलेंच्या या पोस्टवर अनेक रसिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणत्या नाट्यगृहांमध्ये काय परिस्थिती आहे याची गाऱ्हाणीच नेटकऱ्यांनी मांडली आहेत. यावर काही कारवाई होणार का हे वेळच सांगेल.

Web Title: vaibhav mangale marathi actor disappointed on bad situation at theatres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.